श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध' सांस्कृतिक सोहळा 2024
सालाबाद प्रमाणे यावर्षी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पालखीच्या पादुकांचे औंध, पुणे येथे आगमन शुक्रवार, दिनांक ०8 मार्च २०२4 या दिवशी सायंकाळी 6 वाजता होत आहे. या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे सात दिवस सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करीत आहोत. कार्यक्रमाचा शुभारंभ दिंडीने, शनिवार 02-03-2024 रोजी दुपारी 3 वाजता उमाशंकर सोसायटी औंध येथून होत आहे. या सोहळ्यात दिनांक 02 ते 08-02-2024 या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले असून आपण सर्व चोंधे पार्क औंध येथे उपस्थित राहून या सोहळ्यात सहभागी व्हावे हे विनंती. कार्यक्रम पत्रिका 2024 >> कार्यक्रम पत्रिका पीडीएफ डाउनलोड करा
कार्यक्रमाचा शुभारंभ दिंडीने शनिवार 02-03-2024 रोजी दुपारी 3 वाजता उमाशंकर सोसायटी औंध येथून होत आहे. ससेच 02--3-2024 ते 08-03-2024 या कालावधीत सांस्कृहतक कार्यक्रम होणार असून आपण सर्व चोंधे पार्क औंध येथे उपस्थित राहून या आनंद सोहळ्यात सहभागी व्हावे ही विनंती.
शुक्रवार सायंकाळी दिनांक 8 मार्च 2024 रोजी पालखी संध्याकाळी 6 वाजता विठ्ठल मंदिरापासून प्रस्थान करून संध्याकाळी 7.३० वाजता उमाशंकर सोसायटी येथे येईल. तरी सर्व स्वामी भक्तांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे व आरती प्रसादाचा लाभ घ्यावा.
सालाबाद प्रमाणे यावर्षीही स्तोत्र पाठांतर स्पर्धा आयोजित केल्या. तसेच निबंध, वक्तृत्व स्पर्धा व वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये औंध, बाणेर, बालेवाडी येथील शाळेतील विविध गटातील मुले / मुली सहभागी झाली होती.
स्तोत्र पाठांतर स्पर्धेचा बक्षीस समारंभ सोहळा दिनांक 7 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता चोंधे पार्क येथे आयोजित केला आहे.
आदरणीय ह. भ. प. श्री गोविंद देव गिरी महाराज- कोशाध्यक्ष अयोध्या श्री राम मंदिर अयोध्या यांच्या शुभहस्ते "श्री स्वामी समर्थ औंध" पुरस्कार 2024 विश्वधर्मी डॉ. प्रा. विश्वनाथ कराड सर, संस्थापक, महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलोंजि (एम आय टी) विश्वशांती विद्यापीठ पुणे यांना सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी सायंकाळी 7.०० ते 8.०० वाजता पं. भीमसेन जोशी नाट्यगृह, औंध येथे संपन्न होणार आहे.
'श्री स्वामीसमर्थ, औंध' पुरस्कार व सन्मान 2023
डोनेशन: एक नम्र आवाहन
प्रतिष्ठानचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्य संपूर्णपणे समाजाभिमुख आहे. मात्र सध्या ते मुख्यत्वेकरून अनेक स्पर्धांचे आयोजन करुन त्यापासून मिळणाऱ्या वर्गण्या, वार्षिक स्मरणिकेतल्या जाहिराती आणि भक्तांनी उस्फूर्तपणे वाहिलेल्या भेटी यांवरच अवलंबून आहे. या कार्याचा लाभ अधिकाधिक लोकांना व्ह्यावा यासाठी या ईश्वरी कार्याला जास्तीत जास्त साह्य करावे असे आपण सर्वाना नम्र आवाहन आहे.
बँकेचे नाव: सारस्वत को ऑप बँक, आय. टी. आय. रोड, औंध, पुणे.
अकाऊंटचे नाव: Shri Swami Samarth Pratisthan
सेविंग बँक अकाउंट नंबर: 083200100009540, IFSC Code: SRCB0000083
बँकेचे नाव: NKGSB को ऑप बँक लिमिटेड, औंध, पुणे.
अकाऊंटचे नाव: Shri Swami Samarth Pratisthan
सेविंग बँक अकाउंट नंबर: 567, IFSC Code: NKGS0000030