प्रतिष्ठानचे कार्यक्रम

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाज प्रबोधनासाठी विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

औंध गावाचा स्वामी समर्थ पालखी सोहळा व त्यानिमित आयोजित केलेले विविध कार्यक्रम प्रत्येक स्वामी भक्तांना मनःस्वास्थ देणारे आणि आनंददायी आहेत. ज्या प्रमाणे साधकाच्या जीवनामध्ये नाव विधा भक्तीचे महत्व मोलाचे आहे. त्यातली पहिली पायरी श्रवण भक्तीची आहे. आपण त्याचेच साधक आहोत. आणि त्याच साठी सात दिवसाच्या सोहळ्याचे आयोजन करतो. स्वामी भक्तांना उन्नत होण्यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन असते.

"जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्यांशी सांगावे" या संतांच्या वचनाप्रमाणे त्यात वेदपठण, दिंडी,  वारकरी कीर्तन, भजन, प्रवचन, नारदीय कीर्तन, कीर्तन जुगलबंदी, भक्ती संगीत, नृत्य, परिसंवाद, अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.  

प्रवचन परिसंवाद, कीर्तन, संगीत, नृत्य व पुरस्कार सोहळा कार्यक्रम- २०२३

रविवार ०५-०२-२०२३ ते बुधवार ०८-०२-२०२३ पहाटे ६. ते ७. योग प्राणायाम शिबीर श्री पाडेकर गुरुजी

Title वेळ कार्यक्रम कार्यक्रम आणि वक्ते
शनिवार ४ फेब्रुवारी २०२३

दुपारी ३.०० ते ६.००

दिंडी 

स्वामी भक्त परिवार 

शनिवार ४ फेब्रुवारी २०२३

सायंकाळी ६.०० ते ६.३०

वेदपठण  

पौरोहीत्य वर्ग औंध 

शनिवार ४ फेब्रुवारी २०२३

सायंकाळी ६.३० ते ७.००

प्रकट मुलाखत 

हा. भ. प. श्री प्रमोद महाराज जगताप, मुलाखतकार: सौ स्वेता जोशी आणि सौ गंधाली भिडे  

शनिवार ४ फेब्रुवारी २०२३

सायंकाळी ७.३० ते ९.००

किर्तन 

ह. भ. प. श्री प्रमोद महाराज जगताप (साथ सांगत औंध गाव भजनी मंडळ)

रविवार ५ फेब्रुवारी २०२३

सकाळी ९.०० ते १.००

मोफत वैद्यकीय तपासणी (नाव नोंदणी आवश्यक- ९८२३०३७२९२)

डॉ अभिजित बलदोटा, M D, मधुमेह तज्ञ संजीवनी विटा लाईफ औंध, तपासण्या B.S.L., HbA1c, B.P., E.C.G. Lipid Profile, या बरोबर डॉ डोळस आणि डॉ अग्रवाल नेत्र रुग्णालय तपासण्या- डोळे व डोळ्यांचे विकार 

रविवार ५ फेब्रुवारी २०२३

सायंकाळी ६.०० ते ७.०० 

सामुहिक अग्निहोत्र 

अग्निहोत्र वेळ - संध्याकाळी ६.२६, सहभागी होण्यासाठी संध्याकाळी ६ वाजता उपस्थित राहावे. 

रविवार ५ फेब्रुवारी २०२३

सायंकाळी ७.०० ते ७.३० 

प्रार्थना स्वामी भक्त परिवार 

रविवार ५ फेब्रुवारी २०२३

सायंकाळी ७.३० ते ९.०० 

परिसंवाद- विषय आत्मविश्वास 

सूत्रसंचालक: ह. भ. प. श्री अभय टिळक- अर्थविश्लेषक, संत साहित्याचे गाढे अभ्यासक 
प्रास्ताविक- ऍड श्री श्रीकांत पाटील- स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध, पुणे संस्थापक, अध्यक्ष, 
डॉ माधवी वैद्य- मराठी साहित्य महामंडळ माजी अध्यक्ष, डॉ भावार्थ देखणे- संत साहित्याचे अभ्यासक, श्री अभय नलगे- हार्मोनियम वादक, श्री मकरंद टिल्लू- प्रसिद्ध हास्य कलाकार, श्री युवराज  शहा- सामाजिक कार्यकर्ता, श्री अक्षय कुलकर्णी- अभियंता  

सोमवार ६ फेब्रुवारी २०२३

सकाळी ९ .०० ते १.००

महिलांसाठी स्वसंरक्षण शिबीर 

आर्मी ऑफिसर कमांडो- श्री मनोज नायडू आणि सहकारी 

सोमवार ६ फेब्रुवारी २०२३

सायंकाळी ६ .०० ते ७.००

भजन 

विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ- सौ कल्पनाताई रानवडे व सहकारी 

सोमवार ६ फेब्रुवारी २०२३

सायंकाळी ७ .०० ते ९.००

गीतरामायण  

श्री. निनाद आजगांवकर आणि सहकारी, मुंबई 

मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३

सायंकाळी ५ .३० ते ६.३०

भजन  

श्री कांचनलक्ष्मी महिला मंडळ- श्रीसुक्त  व भजन  

मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३

सायंकाळी ६.३० ते ७.००

स्तोत्र पाठांतर स्पर्धेचा बक्षीस समारंभ 

मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३

सायंकाळी ७.०० ते ८.००

संगीताचा कार्यक्रम 

श्री.अथर्व वैरागकर 

मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३

सायंकाळी ८.०० ते ९.००

नृत्यसंध्या- कथ्थकनृत्य

नृत्यआराधना कथ्थक डान्स अकॅडेमी औंध, पुणे-  विदुला हरिप ह्या श्रीमती शरवेदीनी गोळे यांची जेष्ठ शिष्या 

बुधवार ८ फेब्रुवारी २०२३

सायंकाळी ५.०० ते ६.००

भजन 

स्थळ- भीमसेन जोशी नाट्यगृह औंध, पुणे ४११००७
सौ. येवले ताई आणि सहकारी 

बुधवार ८ फेब्रुवारी २०२३

सायंकाळी ६.०० ते ७.००

नृत्यसंध्या- कथ्थक नृत्य कृष्णायन 

टॅप्स अँड स्पिन कथ्थक अकॅडेमी- गुरु अनुजा लिमये 

बुधवार ८ फेब्रुवारी २०२३

सायंकाळी ७.०० ते ९.००

श्री स्वामी समर्थ औंध पुरस्कार सोहळा

श्री स्वामी समर्थ औंध पुरस्कार - मा. पद्मविभूषण प्रा. डॉ. विजय भटकर परम सुपर कॉम्पुटर जनक, कुलगुरू नालंदा विद्यापीठ यांना वैश्र्विक स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक परमपूज्यनिय पांडुरंग  शास्त्री आठवले (दादा) यांची सुपुत्री आणि स्वाध्याय परिवार प्रमुख श्रीमती धनश्री श्रीनिवास तळवलकर (दीदी) यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल 

गुरुवार ९ फेब्रुवारी २०२३

सायंकाळी ६.०० ते ७.३०

श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे विठ्ठल मंदिराजवळ आगमन व मिरवणुक 

मिरवणुक मार्ग - विठ्ठल मंदिर - भैरवनाथ मंदिर - मारुती मंदिर - उमाशंकर सोसायटी पटांगण

गुरुवार ९ फेब्रुवारी २०२३

सायंकाळी ७.३० ते १०.००

संतवाणी - संगीत कार्यक्रम व प्रसाद 

श्री संतोष देशमुख आणि सहकारी

शुक्रवार १० फेब्रुवारी २०२३

पहाटे ५.०० ते ७.००

षोडशोपचार पूजा, रुद्र व वेदपठण