श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना वर्ष २००१ मध्ये ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील यांनी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्याद्वारे समाज प्रबोधनासाठी केली. सुरुवातीची आठ वर्षे श्री स्वामी समर्थांचा एक दिवसीय पालखी उत्सव अत्यंत उत्साहाने साजरा होत असे. वर्ष २०१० पासून म्हणजे स्थापनेच्या ९व्या वर्षांपासून सर्वांच्या प्रेरणेने आणि सहभागाने उत्सावाचा कार्यकाळ वाढून तो सात दिवसाचा झाला. उत्सवात दरवर्षी एक विषय घेऊन त्या विषयाभोवती सात दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यात विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असे वीस पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित केले जातात.
प्रतिष्ठानाची प्रमुख उद्दिष्टे
विचारांच्या माध्यमातून सकारात्मक विचारांनी कार्य करुन स्वतःबरोबर समाजाचाही विकास व्ह्यावा यासाठी कार्य - ज्यामुळे समाजातील नैराश्य, ताणतणाव, दुःखे कमी होवून जीवन सुसह्य होवू शकते. आपली संस्कृति आणि अध्यात्म या दोनही गोष्टी विज्ञानावरच आधारित आहेत. हे ज्ञान विज्ञाननिष्ठ लोकांना विज्ञानाच्या पारिभाषेमध्ये आणि त्याच वेळी सर्वसामान्यांना त्यांच्या परिचित भाषेमध्ये समजावून देणे ही प्रतिष्ठानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
प्रतिष्ठानचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्य
श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाज प्रबोधनासाठी विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यात यज्ञ, प्रवचन, परिसंवाद, कीर्तन, संगीत व पुरस्कार सोहळा तसेच नृत्य, स्मरणशक्ती, रांगोळी, मोफत वैद्यकीय शिबिरे, सत्कार असे सर्वांच्या सहभागातून होणारे कार्यक्रम घेतले जातात.
संस्थेच्या वतीने आयोजित केले जाणारे काही काही प्रमुख कार्यक्रम,
- स्तोत्र पठण स्पर्धा.
- निबंध स्पर्धा.
- वक्तृत्व स्पर्धा.
- बालवाडीपासून ते महाविद्यालयीन मुलांसाठी वैदिक विचारांच्या प्रसारकारितां वेद पठण करविणे आणि वेदॠचांचा अर्थ त्यांना समजावून सांगणे.
- शालेय मुलांच्या मनांमधे पवित्र भाव जागृत करण्यासाठी; आणि त्यांच्या मनात लहानपणापासूनच समाजभान निर्माण करण्यासाठी वारकरी दिंड्या आयोजित करणे.
- मुलींच्या उत्तम आरोग्य आणि कलात्मक विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी नृत्यशिक्षण तथा नृत्यस्पर्धा आयोजित करणे.
- विद्यार्थ्यांसाठी योगासन शिबिर घेणे आणि त्याचवेळी समाजात योगाच्या महत्वाचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न करणे.
- नागरिकांच्या आरोग्यासाठी त्यांची विनाशुल्क वैद्यकीय तपासणी शिबिरें आयोजित करणे.
- विविध आरोग्यविषयक पद्धतींवर जानकर अधिकारी व्यक्तीच्या व्याख्यानांचे आयोजन करणे.
- महिलांमधे सुसंवाद वाढविण्यासाठी महिला भजनी मंडळ व अनुषांगिक कार्यक्रमांचे आयोजन करणे.
- समाजविकासासाठी विविध विषयांवर अधिकारी व्यक्तींची प्रवचने आयोजित करणे.
- समाजातील आदर्श व्यक्तींचा पुरस्कार देऊन यथायोग्य गौरव करणे.
- विविध सामाजिक विषयांवर परिसंवादचे आयोजन करणे. जनतेत प्रतिष्ठानविषयक माहितीचा प्रसार करण्यासाठी नामवंत लेखकांकडून विविध विषयांवर खास लेख लिहून त्यांची वार्षिक स्मरणिका तयार करणे.
- भावी पीढ़ी सुसंस्कारसंप्पन्न होण्यासाठी संस्कारवर्ग घेणे.
- सांप्रतचे धकाधकीचे जीवन, भावनांचा उद्रेक, मानवाच्या मूलभूत समस्या, या सर्वांची मीमांसा करुन मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास व्हावा या दिशेने अध्यात्म आणि विज्ञानयुगांतले मानवी जीवन यांचा समन्वय साधावा या हेतूने प्रेरित होवून सकारात्मक ज्ञानवृद्धीसाठी आठवड्यातून नियमित एक तास प्रार्थना आणि विचारविनिमय करणे.
संस्थापक अध्यक्ष - ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील
श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक आणि प्रेरणास्थान आदरणीय ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट जवळच्या रामपूर या गांवात झाला. त्यांचे उच्च शिक्षण पुण्यातल्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ़ कॉमर्स आणि इंडियन लॉ सोसायटीच्या आय. एल. एस. लॉ कॉलेजमधे झाले. त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली आहे. गेली तीस वर्षे ते अविरत समाजकार्य करीत आहेत. संत वाङमय, धार्मिक ग्रंथांचा त्यांचा गाढ़ा अभ्यास असून अनेक ठिकाणी प्रवचने तथा व्याख्याने यांच्या माध्यमांतून प्रतिष्ठानाला त्यांनी एका उच्च पातळीवर नेवून ठेवले आहे.
कार्यकारणी समिती २०२३
ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील - संस्थापक, अध्यक्ष
श्री सौरभ देशपांडे - कार्याध्यक्ष
श्री अंकुश चोंधे - उपाध्यक्ष
श्री योगिनाथ काशिनाथ कुलकर्णी - कोषाध्यक्ष
श्री दिलीप वाणी
श्री शाम जोशी
श्री अतुल रंगनाथ नाडगौडा
श्री संग्राम राजेंद्र मुरकुटे
ऍड. सौ. गंधाली अभिजित भिडे (सचिव)
श्रीमती मंगला शशिकांत चाफळकर
सौ मिनाक्षी पाठक
एक नम्र आवाहन
प्रतिष्ठानचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्य संपूर्णपणे समाजाभिमुख आहे. मात्र सध्या ते मुख्यत्वेकरून अनेक स्पर्धांचे आयोजन करुन त्यापासून मिळणाऱ्या वर्गण्या, वार्षिक स्मरणिकेतल्या जाहिराती आणि भक्तांनी उस्फूर्तपणे वाहिलेल्या भेटी यांवरच अवलंबून आहे. या कार्याचा लाभ अधिकाधिक लोकांना व्ह्यावा यासाठी या ईश्वरी कार्याला जास्तीत जास्त साह्य करावे असे आपण सर्वाना नम्र आवाहन आहे.

डोनेशन साठी माहिती
बँकेचे नाव: सारस्वत को ऑप बँक, आय. टी. आय. रोड, औंध, पुणे.
अकाऊंटचे नाव: Shri Swami Samarth Pratisthan
सेविंग बँक अकाउंट नंबर: 083200100009540
IFSC Code: SRCB0000083
बँकेचे नाव: NKGSB को ऑप बँक लिमिटेड, औंध, पुणे.
अकाऊंटचे नाव: Shri Swami Samarth Pratisthan
सेविंग बँक अकाउंट नंबर: 567
IFSC Code: NKGS0000030
श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध
(संस्थापक अध्यक्ष - ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील)
नोंदणी क्रमांक: महाराष्ट्र/३५८/२००८/पुणे
३, उमाशंकर सोसायटी, चोंधे पार्क, परिहार चौक जवळ, औंध, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड ४११०६७.