'श्री स्वामीसमर्थ, औंध' पुरस्कार

समाजामध्ये दिव्य काम करणाऱ्या या व्यक्तींच्या कर्तृत्वाने समाज उन्नत होतो. या व्यक्ती अनुकरणीय असतात. म्हणून असाच एका व्यक्तीस श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठाणांतर्फे "श्री स्वामी समर्थ, औंध" पुरस्कार व मानपत्र देण्यात येते.  दरवर्षी सामाजिक, आध्यत्मिक आणि शैक्षणिक कार्यात आग्रसेन असलेल्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित केले जाते.

'श्री स्वामीसमर्थ, औंध' पुरस्कार व सन्मान कार्यक्रमाचे वर्ष 2022 ते 2023 फोटो >>  

श्री स्वामी समर्थ औंध पुरस्काराने पुरस्कृत मान्यवर,

०१) पुरस्कार वर्ष २००७- श्री. रवी घाटे 
०२) पुरस्कार वर्ष २००८- सौ. उमा टिळक 
०३) पुरस्कार वर्ष २००९- पंडित श्री केशव गिंडे, सुप्रसिद्ध बासरी वादक   
०४) पुरस्कार वर्ष २०१०- भानू काळे
०५) पुरस्कार वर्ष २०११- डॉ. सुहासिनी कोरटकर 
०६) पुरस्कार वर्ष २०१२- श्री. अनंत भगवान दीक्षित, संपादक लोकमत
०७) पुरस्कार वर्ष २०१३- श्री. अशोक ज्ञानेश्वर मुरकुटे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते  
०८) पुरस्कार वर्ष २०१४- प्रो. डॉ. पांडुरंग हरी कुलकर्णी, डॉक्टर, अध्यापक, संशोधक, उद्योजक, आयुर्वेद विषयक साहित्याचे परिवर्तक  
०९) पुरस्कार वर्ष २०१५- श्री. ज्ञानेश्वर केशवराव तापकीर, पतपेढी अध्यक्ष, पतसंस्था संस्थापक, नगरसेवक, उद्योजक व विविध पुरस्काराने पुरस्कारीत 
१०) पुरस्कार वर्ष २०१६- श्री. दत्तात्रय गायकवाड, माजी महापौर पुणे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, अध्यक्ष चतुःश्रुंगी देवस्थान 
११) पुरस्कार वर्ष २०१७- डॉ. श्री. अभिजित वाहेगावकर,  शल्यचिकित्सक, वैद्यकीय क्षेत्रातील आदरणीय समाजसेवक
१२) पुरस्कार वर्ष २०१८- ज्येष्ठ ऍडव्होकेट श्री भास्करराव आव्हाड, कायदे क्षेत्रात  धार्मिक क्षेत्रात अतुलनीय योगदान 
१३) पुरस्कार वर्ष २०१९- श्री. हणमंतराव गायकवाड, युवा उद्योजक, संस्थापक अध्यक्ष भारत विकास ग्रुप

१४) पुरस्कार वर्ष २०२०- श्री भानुप्रताप बर्गे, सहा. पोलीस आयुक्त (ए. टि. एस.)  
१५) पुरस्कार वर्ष २०२३ मा. पद्मविभूषण प्रा. डॉ. विजय भटकर परम सुपर कॉम्पुटर जनक, कुलगुरू नालंदा विद्यापीठ