श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानची प्रकाशने

'।।राजाधिराज।। श्री स्वामी समर्थ' स्मरणिका 

वर्ष २०१२ पासून प्रतिष्ठान "राजाधिराज- श्री स्वामी समर्थ" ही वार्षिक स्मरणिका प्रकाशित करते. यातील लेखाद्वारे मानवी जीवनातील उत्तम विचार प्रकाशित करून, उत्तम विचार व समाज यांच्यात पडत असलेली दरी मिटवून टाकण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

राजाधिराज स्मरणिका हा त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. दरवर्षी एक विषय घेऊन त्या विषयाभोवतीचे लेख स्मरणिकेत प्रसिद्ध केले जातात.

खरोखरीच जो कोणी स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेऊन निःस्वार्थ बुद्धीने आणि परोपकारी वृत्तीने त्यांना शरण जातो, त्याचा योगक्षेम स्वामी चालवतात, हे सर्वश्रुत आहे. यास्तव स्वामी समर्थांच्या सिद्धांताची तसेच तत्वज्ञानाची ओळख स्वामीभक्तांनाच नव्हे तर इतर सांप्रदायी मंडळींना व्हावी या उदात्त हेतूने स्वामी भक्तांच्या विनंतीनुसार श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान द्वारा "राजाधिराज स्वामी समर्थ" या स्मरणिकेचे प्रकाशन केले जाते. 

'।।राजाधिराज।। श्री स्वामी समर्थ' या स्मरणिकेतील विचारांचे सामर्थ्य अगाध आहे. यातील लेख लेखकांच्या प्रत्यक्ष जगण्यातूनच आलेले आहेत. त्याला त्यांच्या अनुभवाचा बलदंड आधार आहे. सर्व मानवी भावनांच्या चढ-उताराचा आलेखही त्यात स्पष्ट दिसून येतो.

यातील वेचलेले निवडक अमृत कण "विचाराचे सामर्थ्य" या सदराखाली वाचता येतील.


सामुदायिक प्रार्थना 

चित्तशुद्धीसाठी, मनाच्या स्थिरतेसाठी प्रार्थनेची नितांत आवश्यकता आहे. प्रार्थना एकाग्र मानाने केली की भगवंताशी सहजपणे नाते जोडले जाते. शरीराला जशी अन्नाची गरज, तशी मनाला प्रार्थनेची गरज आहे. शुद्ध मनातले विचार बदलले की जीवन बदलू शकेल. त्यासाठी मंगलमय भावनांचा अविष्कार असायला हवा.

कुटुंब प्रार्थनेत चैतन्यरुपी शक्तीला आपल्याकडे खेचून घेण्याचे प्रचंड सामर्थ्य असते. व्यक्तिगत उपासनेपेक्षा कुटुंब प्रार्थना फलदायी ठरते. वातावरणातील अशुभ व दुष्ट शक्ती दूर निधुन जातात आणि कुटुंबाभोवती चैतन्यशक्तिचे कवच निर्माण होते. अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ हे स्वामी परिवाराचे अधिष्ठान आहे. प्रार्थनेतून मन सुदृढ बनते. चांगल्या विचारांची निर्मिती होते. 

शांत बसावे, अंतःकरण पाहावे. शुद्ध अंतःकरणाने एकत्रितपणे सर्वांच्या कल्याणासाठी केलेले उच्चारण म्हणजे कुटुंब प्रार्थना. विचारांच्या प्रतिमास्वरूप असलेल्या सांगून शब्दांना वर्तनाने अर्थ मिळतो. प्रत्येकाच्या निःस्वार्थ हेतूने ज्ञानातून, त्यागातून शब्दांना मंत्राचे सामर्थ्य प्राप्त होते. समर्पणातून मांगल्यपूर्ण भवितव्य निर्माण करूया आणि त्या साठी कटीबद्ध होऊ या.  


श्री स्वामी समर्थ कृपातीर्थ तारक मंत्र 

'तारक मंत्र' ह्या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, ह्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काही तरी उपाय करताच. स्वामिनी आपल्याला हि अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कोणीच त्यचा विचारही करू शकत नाही. शेवटही ती स्वामींची शक्ती अगम्य शक्ती. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरवात करा आणि बघा तुमच्या शरीरीरात एक मानसिक बळ येते ते. आणि हो जर हा मंत्र तुम्ही हळू हळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती अंगात संचारते हा सर्वच स्वामी भक्तांचा अनुभव आहे. या मंत्रात एक कडवे आहे की "अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी", फक्त आणि फक्त ह्या स्वामींच्या वाचनावर स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा ह्या जगातील कितीही मोठी गोष्ट असून द्या. ती तुम्ही सहजच मिळवाल आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा किवा नातेवाईक म्हणतील असे तू काय करतो रे कि तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते ती. तेह्वा मनातल्या मनात स्वतः लाच बोला की "माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत, ह्या जगाचा जो एक मालक आहे. ह्या जगात झाडांची पाने सुद्धा जो हलवतो, सर्वांचे रक्षण करतो, असे स्वामी महाराज माझ्या मागे होते, आहेत, आणि राहणारच. सर्व जणानी हा तारक मंत्र म्हणायला सुरवात करावी. हा म्हणत असताना एका वाटीत पाणी घेऊन, अगरबत्ती लाऊन त्याची राख त्या वाटीत पडेल अशी ठेवा. आणि मंत्र झाल्यावर घरातल्या सर्वांनी ते तीर्थ म्हणून घ्या आणि बघा अनुभव स्वत च अनुभवून. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात पण आपणच त्यांना ओलखू शकत नाही. कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात फक्त आपण हे लक्ष्यात आणले पाहिजे की स्वामी सदैव माझ्या बरोबर आहेत. ते म्हणतात ना "भगवंताला, माझ्या, आपल्या, स्वामींना बघायला तशी दृष्टि असावी लागते"!


समर्था तुला मागणे हेचि आता 

या छोट्या पुस्तिकेत, समर्था तुला मागणे हेचि आता ही भावपूर्ण प्रार्थना, सगुरुंची प्रासादिक भजने, सद्गुरू पाउलाष्टक, अपराध क्षमा प्रार्थना आणि आरती उमा सर्वांचा हा संग्रह आहे.


'स्वामी आराधना' सी डी 

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे दार महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी सामूहिक स्वामी समर्थांच्या आरतीची सेवा असते. तसेच सामूहिक नामस्मरण ही केले जाते. या आरतीचा उद्देश परिवारातील स्वास्थ्य कायम राहावे, आत्मबल वाढावे, मानसिक शांती प्राप्त व्हावी असा आहे. याच उद्देशाने 'स्वामी आराधना' या सीडीचे प्रकाशीत करण्यात आली आहे.