प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष, ऍड. श्री श्रीकांत पाटील यांचे "श्री स्वामी समर्थ- औंध" पुरस्कार २०१८ सोहळ्यातील मनोगत

श्री श्रीकांत पाटील यांचे "श्री स्वामी समर्थ- औंध" पुरस्कार २०१८ सोहळ्यातील मनोगत
ऍड. श्री श्रीकांत पाटील "श्री स्वामी समर्थ- औंध" पुरस्कार २०१८ सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करताना 

नमस्कार ! श्री स्वामी समर्थांना स्मरण करून, स्वामी समर्थांच्या कृपेने, आणि स्वामी समर्थांच्याच कृपेमुळे चालणारा हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचा आजचा हा प्रमुख दिवस असल्या मुळे या  कार्यक्रमाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. नितीन कर्मळकर, जे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत, मला खरेच इथे सांगायला आनंद वाटतो की त्यांचे नाव उच्चारल्यानंतर सगळे लोक म्हणतात "किती सात्विक संत आहे". इव्हन आव्हाड सरांना मी जेव्हा पहिल्यांदा हे नाव सांगितले तेव्हा आव्हाड सर पण म्हणाले "अरे वा ! छान ! मला आनंद वाटेल त्यांच्या हस्ते पुरस्कार घ्यायला."

सर ! आणि खरा एक योगायोग असा आहे की गेल्या वर्षी मी कर्मळकर सरांना फार त्रास दिलेला आहे. गेल्या वर्षी आमच्या दृष्टीने ऐतिहासिक असा एक यज्ञ आम्ही केला होता. त्या यज्ञाच्या संकल्पना अशा होत्या की सेलूकर महाराज आमच्या ठिकाणी आलेले होते. त्यांची इच्छा अशी होती की यज्ञ चांगलाच आहे. परंतु चांगला असणारा जो यज्ञ आहे तो बुद्धिवादी जे लोक आहेत त्यांच्या मना मध्ये उतरला पाहिजे. विज्ञान आणि आध्यत्म या दोन्हीच्या दृष्टीने तो जर यज्ञ सिद्ध झाला तर आम्हाला जास्त आनंद वाटेल. त्या करता खरेच बहुमोलाची मदत कर्मळकर सरांनी आम्हाला केलेली आहे.

श्री शिवाजीराव कचरे साहेब आयुक्त आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. नवनाथ जगताप साहेब आलेले आहेत. मनोज वाडेकर आहेत. आणि आजची जी सत्कार मूर्ती आहे श्री भास्करराव आव्हाड आणि त्यांच्या सुविद्य पत्नी या ठिकाणी आलेल्या आहेत. सगळ्यांचे मी मनापासून स्वागत करतो.

स्वामीसमर्थ प्रतिष्ठानचे हे सतरावे वर्ष आहे. आणि सतरा वर्षामध्ये आम्ही जे काही कार्य केलेले आहे, वास्तविक पाहता एक मी सांगू इच्छितो, हे प्रतिष्ठान ज्या वेळेला आम्ही स्थापन केले, ते आमचे सगळे विश्वस्थ येथे आहेत. या विश्वस्तांचा एक प्रतिनिधी म्हणूनच मी बोलत आहे. मलाही सांगायला आनंद वाटेल की प्रतिष्ठान स्थापन करताना आम्ही सगळ्यांनी एक प्रतिज्ञा केली किंवा संकल्प सोडला होता, आणि तो संकल्प या पद्धतीचा होता, आम्हाला कोणी समाजानी बंधन घातले नाहीये की तुम्ही समाजाचे काम करा, प्रतिष्ठानचे काम करा. परंतु आम्ही सगळ्यांनी मिळून स्वीकारलेले हे एक बंधन आहे. जर काम करायचे आहे तर ते चांगले आणि उत्तमच काम करायचे.

आणि आज या सतराव्या वर्षामध्ये कार्यक्रमाला जी उंची वाढलेली आहे, तर त्याचे एकमेव कारण असे आहे की आमच्या कार्यक्रमामध्ये निस्पृहता जी आहे, तीच निस्पृहता याला कारणीभूत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही कार्यक्रमाचा साचा ज्या वेळेला ठरवला, तर तो साचा ठरवतांना आमची इच्छा अशी होती, की हा जो कार्यक्रम आम्ही करणार आहे तो नवविधा भक्तिच्या माध्यमातनं भक्तांचे किंवा मानवाचे जे परिवर्तन होते, आणि अध्यात्मामध्ये जर विचार केला तर मानव उन्नत होतो, तर तो दृष्टिकोन ठेवून कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.

कार्यक्रमाचे सातच दिवस आहेत. पण या सात दिवसामध्ये साधारणतः सतरा ते अठरा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. त्याच्या मध्ये दिंडी असते. दिंडी शाळेतल्या मुलांची असते. औंध मधल्या ज्या शाळा आहेत त्या शाळा या ठिकाणी सहभागी होतात. त्यानंतर आम्ही वेदपठण करतो. वेदपठण करण्याचा उद्देश असा आहे, की या ठिकाणी पौरोहित्य करणाऱ्या काही महिला आहेत. त्या महिला आता सतरा वर्षामध्ये सतरा सूक्त ऋग्वेदातली म्हणलेली आहेत. त्या निमित्ताने वेद काय आहेत हे लोकांना कळते. वेद म्हणून झाल्यानंतर आम्ही लोकांना त्याचा अर्थ सांगतो.

त्यानंतर वारकरी संप्रदायाचे कीर्तन असते. कीर्तनानंतर आम्ही नृत्याचा कार्यक्रम ठेवतो. आता आज जो नृत्याचा कार्यक्रम झाला. आमच्या विभागामध्ये नवीन शिकणाऱ्या ज्या मुली आहेत आणि नवीन क्लास घेणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांच्या मार्फत आम्ही हा कायर्क्रम ठेवतो.

त्याच्यानंतर परिसंवादाचा भाग आम्ही ठेवतो. परिसंवादामध्ये दरवर्षी आमचे जे विषय आहेत, त्याची सुरवात ज्या वेळेला केली तेव्हा नामस्मरण हा विषय होता. त्या नंतर भक्ती, धर्म, श्रीराम, त्या नंतर शरीर. शरीर म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने शरीर कसे आहे? विज्ञानाच्या दृष्टीने शरीर कसे आहे? पातंजली योग्य शास्त्राच्या मानाने शरीर कसे आहे? हे शरीराचे महत्व किती? आणि शरीराच्या महत्वा प्रमाणे आपण जर काम करू लागलो? तर या समाजा मध्ये किती उन्नती होऊ शकेल? असे आम्ही दृष्टिकोन ठेवलेले होते. मग शरीरानंतर 'मन', त्यानंतर 'सामर्थ्य विचारांचे'. गेल्या वर्षी 'आनंद' हा विषय होता. आता यावर्षी आम्ही जो विषय घेतला होता तो होता 'प्रार्थना'. म्हणजे मनाचे सामर्थ्य इतके आहे, परंतु मनाला, जशी शरीराला अन्नाची गरज आहे तशी मनाला प्रार्थनेची गरज आहे. आणि अशा पद्धतीने प्रार्थना एका अत्युच्च लेव्हलचा विचार जर देत असेल तर तोच विचार माणसाला ऊर्जा देईल. आणि माणसांमध्ये अजून उन्नत्ती होऊन माणूस महापुरुषांसारखा काम करू शकेल, असे आम्हाला वाटते म्हणून आम्ही हे वेगवेगळे विषय घेतो.

त्यानंतर, हे जे विषय आहेत हे विषय मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत असताना, ज्या वेळेला प्रतिष्ठान अनेक वर्ष काम करत असताना आम्ही अशा व्यक्तींना पुरस्कार देतो. त्या पुरस्कारा मागची संकल्पना अशी आहे, ज्यावेळेला पुरस्कार देताना ती व्यक्ती कोण आहे? त्यांनी काय कार्य केलेले आहे? त्यांच्या केलेल्या कार्याचे समाजात परिवर्तन कसे झालेले आहे? आणि त्या परिवर्तनाचा निष्कर्ष हा सजातीय आहे किंवा पॉझिटिव्ह आहे? आणि खऱ्या अर्थाने समाज जर त्यांना आदर्श म्हणून गणला जातो हा दृष्टिकोन आम्ही घेत असतो. आतापर्यंत अशा अनेक लोकांना आम्ही पुरस्कार दिलेत. त्यात अकरा लोक आहेत. पहिला पुरस्कार आम्ही रवी घाटेंना दिला. त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता त्यावर्षी. त्यांनीआय टी’ मघ्ये चांगले काम केलेले आहे. त्यानंतर उमा टिळक आहेत. भानू काळे, पंडित केशव गिंडे, जे बासरीमघ्ये प्रसिद्ध आहेत. सुहासिनी कोरटकर संगीतामध्ये आहेत. प्रा. डॉ पांडुरंग हरी कुलकर्णी, आयुर्वेदावरती प्रचंड काम केलेले आहे. श्री ज्ञानेश्वर भाऊ तापकीर जे आता आहेत इथे, सहकार मध्ये त्यांनी भरपूर काम केलेले आहे. दत्त गायकवाड, आमच्या पुरस्काराचे नावाचं असे आहेश्री स्वामी समर्थ - औंध’, आणि औंध मध्ये त्यांनी चांगले काम केलेले आहे म्हणून त्यांनाही आम्ही पुरस्कार दिलेला आहे. डॉ. अभिजित वाहेगांवकर यांनी हॅन्ड सर्जरीवरती जगात सर्वात चांगले कार्य केले आहे त्यांनाही आम्ही पुरस्कार दिलेला आहे. आणि या वर्षीचा जो पुरस्कार आहे, तो ऍडव्होकेट भास्करराव आव्हाड यांना आम्ही दिलेला आहे.

भास्करराव आव्हाड हे खऱ्या अर्थानी माझे गुरु आहेत. त्यांच्याच कडे मी शिकलो. आणि खऱ्या अर्थाने मला आनंद आणि अभिमान वाटतो की त्यांचे खऱ्या अर्थाने ज्ञान प्रतिभा या सगळ्या गोष्टी मी पाहिल्या. आणि मी ज्या पाहिल्या त्या तुम्हाला सांगण्यासाठी माझ्याकडे खरंच शब्द नाहीत. त्यांचे नावाचं भास्कर आहे. परंतु केव्हाही मला असे वाटते की त्या सूर्याला लाजवेल असे त्यांच्याकडे ज्ञान आहे. त्याचा आज आम्हालाही अभिमान वाटतो. सूर्याला लाजवेल असे का? तर सूर्य रोज सकाळी उगवतो पण तो संध्याकाळी मावळतो. आणि संध्यकाळी मावळल्यानंतर रात्र होते. या रात्रीच्या अंधाराला प्रकाश तो करु देत नाहीये, होऊ शकत नाहीये. परंतु सरांनी आज आमच्या सारख्या विध्यार्थ्यांना निर्माण केलेले आहे. आम्ही अशा पद्धतीचे ज्ञान समाजाला देतो की ते कायम स्वरूपी ज्ञानी असतात. सरांना परीस जरी म्हणले तरी ते कमीच पडेल. कारण परीसाचा जर लोखंडाला जर स्पर्श झाला तर त्या लोखंडाचे सोने होते. परंतु ज्या लोखंडाचे सोने होते त्याला परीसपणा कधी येत नाही. तर सरांनी आम्हाला परीसासारखे बनवलेले आहे. त्यामुळे सरांच्या बाबतीत जर बोलायचे असेल तर अशा असंख्य गोष्टी आहेत, की सरांची प्रतिभा, शिकवण्याची त्यांची जी कला आहे. त्यांचे असणारे जे ज्ञान आहे. त्यांची असणारी अचाट जी स्मरणशक्ती आहे. एकंदर त्यांनी इतकी प्रतिभा आणि आमच्या वरती त्यांचे इतके प्रचंड प्रभुत्व त्यानी निर्माण केलेले आहे ना! की आजही आम्हाला, पंचवीस वर्षा पूर्वी आम्ही शिकल्यानंतर आजही आम्हाला असे जाणवते.

ऍडव्होकेट सुभाष पवार आलेले आहेत. पुणे बारचे अध्यक्ष आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे.

प्रतिष्ठान ज्या वेळेला काम करते. हे काम अध्यात्माच्या बेसवर जरी असले, आध्यत्मिक प्रबोधन करता असताना आम्ही अनेक गोष्टी समाजातन ज्या आम्हाला पटतात, आणि अध्यात्मामध्ये नसाव्यात असे आम्हाला वाटते, आणि अध्यात्माचे जे विडंबन होते, ते आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो. आणि हे करत असताना, विज्ञान म्हणजे काय आहे? धर्म म्हणजे काय आहे? कर्मकांड म्हणजे काय आहे? अध्यात्म म्हणजे काय आहे? आणि या सगळ्यांचा मानवतेच्या विकासाला काही उपयोग आहे का? हा मी विचार करतो. आणि हा विचार करून आम्ही जे प्रयोग करतो? तर त्या प्रयोगाचे, म्हणजे उदाहरणार्थ यज्ञाचा जो प्रयोग केला आम्ही, तर त्या प्रयोगामध्ये आम्ही ऍलोपॅथीचे पंधरा डॉक्टर त्या ठिकाणी बसवले होते. दोन शास्त्रज्ञ, डॉ. रघुनाथ शुक्ल होते. डॉ. प्रमोद मोघे होते. हे दोघेही होते, आणि सेलूकर महाराजही होते. आमचा प्रयत्न एव्हढाच होता, की जे प्रदूषण वाढते ते प्रदूषण यज्ञामुळे नष्ट होते किंवा कमी होते? आणि त्यासाठी कर्मळकर सरांनीच आम्हाला युनिव्हर्सिटीतून एक मशीन दिलेले होते. त्या मशीनने आम्ही हवा वगैरे चेक केली. आणि चेक केल्यानंतर आम्हाला जाणवले की प्रदूषण फार कमी होते. असाच प्रयोग आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत असतो.

म्हणजे अध्यत्मामध्ये जी काही लोक आहेत, इव्हन अंधश्रद्धेवरती काम करायला नको, की जेव्हा आपण काम करतो, खर्या अर्थानी अध्यात्म हे इतके प्रबळ आहे की त्याच्यामुळे आपल्याला आत्मबळ मिळते आणि समाजात आपण चांगले काम करू शकतो. हाच दृष्टीकोन आम्ही घेतलेला आहे. आणि अशा दृष्टीकोनातून स्वामी समर्थ प्रतिष्ठान अनेक वर्षे काम करत आहे.

आज या ठिकाणी अनेक तुम्ही दिग्गज लोक आलेले आहात. त्याबद्दल आपणा सर्वाना मी धन्यवाद देतो.  

(दिनांक ५ मे २०१८ रोजी "श्री स्वामी समर्थ- औंध" पुरस्कार २०१८ सोहळ्यातील भाषणावरून संपादित)