स्वामी आराधना कार्यक्रम

दर गुरुवारची स्वामींची आरती
दर गुरुवारची स्वामींची आरती

समाजातील नैराश्य चिंता उदासीनता दूर करण्यासाठी 788 कुटुंबामध्ये अग्निहोत्र व ओंकारापसून ते ध्याना पर्यंत प्रार्थनेच्या माध्यमातून समाधान व आनंद निर्माण करण्या करिता नियमितपणे दर गुरुवारी एका कुटुंबाच्या घरी स्वामी आराधना कार्यक्रम केला जातो. संपूर्ण कुटुंबात यामुळे जगण्यासाठी उत्साह आणि ऊर्जा वाढून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. 

या कार्यक्रम निमित्ताने स्वामी भक्तांकडून स्वामींची भावपूर्वक आराधना होते. स्वामी चरणांशी समर्पण होते. एकूण ३२ मिनिटाच्या या कार्यक्रमात चिंतन, आरती, कापूरआरती, मंत्रपुष्पांजली, नामस्मरण, ध्यान, व स्वामी विचार याचा समावेश आहे.

'स्वामी आराधना' हा स्वामी परिवारातील एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. अध्यात्मिक विचाराच्या आधारावर सुख-समाधान, आनंद होण्यासाठी जी कृती सर्व धर्मग्रंथाना (प्रस्तानत्रयीला) अपेक्षित आहे, स्वामी आराधनेच्या निमित्ताने त्याच पद्धतीची कृती करून, खऱ्या अर्थाने स्वामींना जीवन अर्पण करून त्याच्या करुणेने कृतार्थ होणे हा उद्देश येथे आहे.

 २४ तास आपले हृदय चालविणारा, आपल्या श्वासाकडे लक्ष देणारा भगवंत आपली सतत काळजी घेतो. त्याच्या साठी आपण निदान ५० मिनिटे तरी आठवड्यातून वेळ काढला पाहिजे.  - - संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील

उपासना पद्धती: आठवड्यातून एकदा, वार: गुरुवार, कार्यक्रमाचा काळ: ३२ मिनिटे, उपासना वेळ: संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी, स्थान: स्वामी भक्तांचे घर 

कार्यक्रम: 

•    स्वामी प्रतिमा स्थनावर ठेवणे 
•    अग्निहोत्र विधी
      
      येथे स्वामी स्वामी आराधनेचा ऑडिओ प्ले करावा.
•    स्वामी पूजा          
•    कालभैरव अष्टक 
•    स्वामींची आरती  
•    कापूर आरती    
•    मंत्र पुष्पांजली      
•    स्वामी नाम स्मरण  
•    स्वामींचे ध्यान
  
      स्वामींचे ध्यान आणि गाजर झाला की मुख्य कार्यक्रम पूर्ण होतो.
      या पुढे चिंतन आहे
•    स्वामी विचार  
•    प्रसाद वाटप   
    

आराधनेची पूर्व तयारी 

•    स्वामी पूजास्थान व्यवस्था 
•    अग्निहोत्राची तयारी 
•    पूजेची तयारी  
•    भक्तांना बसण्याची तयारी   
•    प्रसाद व्यवस्था - नैवेद्य म्हणून फुटाणे, खडीसाखर, पेढे किंवा फळे यापैकी एक असावे. 
•    पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. 
•    सगळ्यांना कार्यक्रम स्थानाचा पूर्ण पत्ता व फोन नंबर कळवणे.  

अग्निहोत्राची तयारी 

•    घरातले एक स्थान निश्चित करणे.
•    स्टूल आणि खुर्चीची व्यवस्था करणे.

नित्य अग्निहोत्रामुळे घरातील वातावरण निर्जंतुक होते, शुद्धता येऊन घरातली पवित्रता वाढते. त्यायोगे प्राणशुद्धी व मन:शुद्धी लाभते. मनावरील ताण तात्काळ दूर होऊन प्रसन्नता लाभते.  - - संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील

मार्गदर्शक सूचना 

  • स्वामींची आरती दर गुरुवारी ३२ मिनिटाची आहे, त्यात १५ मिनिटाचे चिंतन आहे.
  • आरती सुरु झाल्यापासून संपेपर्यंत पूर्ण लक्ष आरतीकडे, शब्दांकडे, स्वामींकडे दिल्यास त्याचे फळ तात्काळ मिळते. 
  • आरती, नाम स्मरण, आणि ध्यान चालू असताना स्वामी भावात रहावे, स्वामींवर लक्ष्य केंद्रित करावे. 
  • आरतीनंतर नामस्मरण ध्यान एकांग्रतेने करावे म्हणजे मन प्रसन्न होते. 
  • आरती व नंतर कापूरआरती असते. ती झाल्यानंतर जागेवरून कोणी उठू नये. मंत्रपुष्पांजली बसूनच म्हणावी. 
  • मंत्रपुष्पांजली नंतर ६ मिनिटांचे नामस्मरण करून एक मिनिटाचे डोळे बंद करून ध्यान करावे. 
  • आरतीस नैवेद्याचाच प्रसाद असावा. घरातील व्यक्तींनी आरतीकडेच लक्ष द्यावे. 
  • कार्यक्रमात ११ जण असावेत. 
  • अग्निहोत्राच्या पूर्वी दहा मिनिटे सर्वानी हजार रहावे. आपापल्या स्थानी बसून घ्यावे. स्वामी स्मरणात वेळ घालवावा. 
  • कार्यक्रम सुरु झाल्या नंतर स्वामींचे विचार पूर्ण होईपर्यंत जागा सोडू नये.  
  • आराधनेवेळी सर्व हजर व्यक्तींनी आपपले फोन सायलेंट मोड मध्ये ठेवावेत. 
  • संपर्कासाठी पत्त्यासोबत फोन नंबर सुद्धा द्यावा.

'स्वामी आराधना' कार्यक्रम आपल्या घरी करण्यासाठी किंवा या कार्यक्रमात सामील होण्यासाठी संपर्क-
संस्थापक अध्यक्ष - ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील, ३ उमाशंकर सोसायटी, चोंधे पार्क, परिहार चौक जवळ, औंध, मोबाईल: +९१ ९३७१०२०६३२, ९४०३११०५१८, इमेल: shrikantpatil@yahoo.co.in 

>> ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील यांचे स्वामी आराधनेवरचे बहुमोल मार्गदर्शन वाचण्यासाठी क्लिक करा 

स्वामी आराधनेवर नेहेमी पडणारे प्रश्न 

१) आराधनेचा अधिकाधिक लाभ मिळावा या करिता काय करावे ? 
उत्तर: कार्यक्रमा पूर्वी आपापली कामे पूर्ण करण्याची काळजी घ्यावी. कार्यक्रमाची वेळ पाळावी.  कार्यक्रमातील विधी चालू असताना स्वामींकडे दृष्टी असावी. मनातून सर्वांशी प्रेमभाव असावा. कार्यक्रमासंबंधित काही सूचना असतील तर त्या काळजी पूर्वक पाळाव्यात.  

२) या कार्यक्रमात कोणते विधी केले जातात ?
उत्तर: या कार्यक्रमात अग्निहोत्र, स्वामी पूजा, स्वामींची आरती, कापूर आरती, मंत्र पुष्पांजली, नाम स्मरण, ध्यान आणि स्वामी विचार असे विधी क्रमाने होतात. 

३) स्वामी आराधनेचा लाभ कशा प्रकारे होतो ?
उत्तर: स्वामी भक्तांवर दोन प्रकारे आराधनेचे प्रतिबिंब पडलेले दिसून येते. पहिले भक्तांच्या अंतरंगात पडते, म्हणजे त्याला आतून प्रसन्नता अनुभवाला येते, त्याचे मन स्वामी नामस्मरणात एकाग्र  होऊ लागते. ही एकाग्रता नंतर ही नेहेमीच्या इतर कामात जाणवत राहते. दुसरे प्रतिबिंब बाहेरून जाणवते, या काळात स्वामी भक्त  चिंता सोडून निवांत झालेला, आनंदी झालेला दिसतो. ज्या स्थानी हा कार्यक्रम होतो तेथे मांगल्याची वाढ होते. अग्निहोत्र हे पर्यावरण पूरक असल्यामुळे वातावरणाची शुद्धता होते.

४) हा कार्यक्रम आयोजित करण्या साठी काही देणगी द्यावी लागते का?
उत्तर: येथे देणगी साठी कुठलेही बंधन नाही. हे प्रतिष्ठानचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्य आहे. हे संपूर्णपणे समाजाभिमुख आहे. या ईश्वरी कार्याला जास्तीत जास्त साह्य करावे या भावनेने उस्फूर्तपणे देणगी देण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा किंवा जीपे, फोनपे, युपीआय पे ने देणगी देऊ शकता. देणगी दिल्यानंतर प्रतिष्ठानला त्या प्रमाणे कळवावे.  

५) माझ्या घरी ’स्वामी आराधना' कार्यक्रम करायचा आहे. त्यासाठी कुठे संपर्क करावा ? 
उत्तर: संस्थापक अध्यक्ष - ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध, यांच्याशी खालील पत्त्यावर संपर्क करावा- पत्ता: ३, उमाशंकर सोसायटी, चोंधे पार्क, परिहार चौक जवळ, औंध, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड ४११०६७.

६) स्वामींच्या आराधनेचा मनावर काही परिणाम होतो का ?
उत्तर: माणसाचे मन हे त्याच्या ठिकाणी असणाऱ्या तेजस्वी शुद्ध शक्तीचे प्रतिबिंब आहे. परंतु ते बाहेरच्या प्रभावाने बाधित होऊन बसले आहे. म्हणून त्याचे भाव शुद्ध झालेले दिसतात. आराधनेच्या निमित्ताने स्वामी शक्तिच्या संपर्कात आल्यावर मनावरचा अशुद्ध प्रभाव नाहीसा होऊन ते मूळ परिपूर्ण, स्थिर आणि नित्य स्वरूपात पुन्हा येते. हे भक्ताला आतून आनंदाच्या रूपाने जाणवते. तर इतरांना बाहेरून जाणवते. हे स्व-बळावर करायला गेले तर अशक्य आहे. आराधनेच्या निमित्ताने स्वामी शक्तीचे बळ येथे उपयोगाला येते. अशा प्रकारे स्वामी आराधनेत 'अशक्य ते शक्य करतील स्वामी' याची श्रद्धावान भक्ताला आतून प्रचिती येते.

>>  ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील यांचे स्वामी आराधनेवरचे बहुमोल मार्गदर्शन वाचण्यासाठी क्लिक करा.

>>  अग्निहोत्राची थोडक्यात ओळख जाणून घेण्यासाठी क्लिक करा.