सालाबाद प्रमाणे यावर्षी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पालखीच्या पालखीचे औंध, पुणे येथे आगमन सायंकाळी सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२० या दिवशी होत आहे. या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे सात दिवस सांस्कृतिक सोहळ्याचे आपण आयोजन करीत आहोत. आपण सर्वानी उपस्थित राहुन या आनंद सोहळ्यात सहभागी व्हावे ही नम्र विनंती.
मानव धर्माचे अधिष्ठान परमार्थ व अध्यात्म आहे. एकविसाव्या शतकात अध्यात्माचा नवीन अर्थ शोधून मानव मानवतेकडे कसे उन्नत होईल हा दृष्टीकोन ठेऊन श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान कार्य करीत आहे. विज्ञान, धर्म, कर्मकांड, अध्यात्म आणि मानवतेचा विकास ह्या सर्वांचा एकविसाव्या शतकात कसा समतोल राखता येईल; मानवतेची पातळी वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरांवर कशी वाढवता येईल त्या साठिचा हा खारीचा वाटा आहे.