प्रा. डॉ. नितीन करमाळकर, कुलगुरु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, यांचे "श्री स्वामी समर्थ- औंध" पुरस्कार २०१८ सोहळ्यातील मनोगत

प्रा. डॉ. नितीन करमाळकर, कुलगुरु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, यांचे "श्री स्वामी समर्थ- औंध" पुरस्कार २०१८ सोहळ्यातील मनोगत
"श्री स्वामी समर्थ- औंध" पुरस्कार २०१८ सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करतांना प्रा. डॉ. नितीन करमाळकर, कुलगुरु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे.

नमस्कार ! व्यासपीठावरील सन्माननीय उपस्थिती, आजचे सत्कारमूर्ती एडव्होकेट भास्करराव आव्हाड सर, ज्या प्रतिष्ठानतर्फे हा पारितोषिक सोहळा संपन्न झाला, ते स्वामीसमर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष पाटील सर, सौ. आव्हाड मॅडम, इतर उपस्थित श्रोतेजन हो.

खरंम्हणजे, विद्यपीठाचा कुलगुरू या नात्याने जे जे समाजात चांगले चालते, चांगले घडते, त्याच्या मध्ये विद्यापीठाचा सहभाग असणे गरजेचे असते. आणि एका उत्तुंग अष्टावधानी अशा व्यक्तीचे जेव्हा समाजात केव्हातरी कौतुक होते, पुरस्कार म्हणजे कौतुक असते. आणि कुठेतरी एक पाठीवर थाप देण्याचा प्रकार असतो. जे कार्य त्यांनी आतापर्यंत केले, सरांचा नुकताच अमृत महोत्सव ही  झालेला आहे. पंच्यात्तर वर्ष झाले. आणि पंच्याहत्तर वर्षाच्या कारकीर्दीमध्ये कारकीर्दी मध्ये अनेक अत्यंत चांगले विद्यार्थी त्यांनी घडवले, इथेच जवळ जवळ तीस चाळीस विद्यार्थी आहेत जे त्यांनी निर्माण केलेले आहेत. आणि अशा असंख्य विध्यर्थ्याना मार्गदर्शन करुन, समाजामध्ये चांगल्या गोष्टी घडवण्याचा-रुजवण्याचा जो प्रयत्न त्यांनी आयुष्यभर केलेला आहे. आणि मी मुद्दामहून शब्द वापरला "अष्टावधानी". अष्टांगांनी केलेले कार्य आहे.

यांच्या मध्ये, साहित्यामध्ये सुद्धा रुची आहे. साहित्यामध्ये कार्य आहे. चांगले आचरण आहे. सुसंस्कृत स्वभाव आहे. ऍडव्होकेट म्हणजे बेसिकली वकिली. वकिली करत असतांना सुद्धा चांगल्या मार्गानेच वकिली करणे आणि चांगलेच शिष्य निर्माण केले. कवी आहेत ते उत्कृष्ठ. समाजासाठी चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. अशा अनेक सगळ्या, ज्याला अष्टांग म्हणतात त्या सगळ्यात पारंगत असलेल्या अशा एका व्यक्तीचा जेव्हा सत्कार होतो तेव्हा विद्यापीठ सुद्धा दुसरे काय करत असते

विद्यापीठाचे कार्य आहे समाज प्रबोधन. चांगले विद्यार्थी घडवणे आणि त्यातून समाज घडवणे. आणि त्या अशा कुठे, अशा समाजातल्या एका चांगल्या माणसाच्या जेव्हा कार्याचा कुठेतरी गौरव होत असतो तेव्हा विद्यपीठाचा सहभाग हा अपेक्षित आहे. मी इथे विद्यपीठाचा कुलगुरु नाही तर एक विद्यापीठाचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इथे उपस्थित आहे. अशा कार्यक्रमामध्ये विद्यपीठाने सहभाग घेतला पाहिजे, म्हणून मी मुद्दाम इथे उपस्थित आहे. मला खूप त्यांची जी बायोडाटा, किंवा आताचे जे भाषण ऐकत असताना नाव तर मी बरीच वर्षे ऐकत आहे. पण महाराष्ट्रात वकिली क्षेत्रात जी काही नामांकित नावे आहेत त्याच्यामध्ये अत्यंत उत्तुंग असे नाव त्यांचे आहे, पी. बी. सावंतांचे आहे. अलीकडे आपल्या सगळ्यांना माहिती झालेले पब्लिक प्रॉसिक्युटर निकम सरांचे आहे. आणि विद्यापीठात शिक्षक असल्या मुळे एक गोस्ट चांगली असते, कधीना कधी या लोकांची कुठेतरी रुजवात होते. आणि जवळून पाहायला मिळते, ऐकायला मिळते, त्यांचे विचार समजतात

आणि विद्यापीठ शेवटी अशा विचारांनी मोठे होत असते. असे विचार कुठेतरी समाजात रुजवण्याचे काम विद्यापीठाने केले पाहिजे. विद्यापीठ म्हणजे फक्त विद्यापीठाचा चारशेअकरा एकराचा कॅंपस नसून, समाजाशी त्याचे कुठेतरी लिंकेज असले पाहिजे. समाजात डोकावून पाहायला पाहिजे. समाजाच्या चांगल्या गोष्टी उघडताहेत त्या, कुठे तरी त्या आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत आणल्या पाहिजेत. त्या तुमच्या सिल्याबस मधून असतील, शिक्षणातून असतील. कुठे तरी विद्यार्थी घडत असताना त्यांच्या समोर रोल मॉडेल आपण ज्याला म्हणतो ते आणणे गरजेचे असते. आणि अलीकडे हीच संकल्पना दिवसेंदिवस थोडीशी धूसर होत निघाली आहे. चांगली माणसे त्यांच्या समोर अणणे आणि दाखवणे हा सुद्धा मोठा एक पेच होऊन बसलेला आहे. समाजात खूप कमी अशी चांगली माणसे असतात की ज्यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी पुढे चालावे. आणि अशा पैकी एक आव्हाड सर आहेत. त्यामुळे मला वाटले की विद्यापीठाचा एक प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमात उपस्थित रहावे. मला संयोजकानीं मुद्दामहून ही संधी दिली बद्दल संयोजकांचा आभार मानतो.  

समाज प्रबोधन करण्याचे काम विद्यापीठ करत असते. आणि या चांगल्या लोकांच्या सत्कारातुन एक सदाचरण, एक चांगले आचरण करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचे उदहारण विद्यार्थ्यांसमोर ठेवून आपला प्रयत्न असतो की एक चारित्र्य संपन्न असा विद्यार्थी घडावा. आणि हा चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडत असताना त्याच्या समोर तशी चांगली व्यक्तिमत्व असणे गरजेचे आहे. आणि त्या दृष्टीने एक उत्कृष्ट  व्यक्तिमत्वाचा आपण इथे सत्कार केलेला आहे. मला निश्चित आवडेल की आज इथे झालेले आहे

परवा मी निकमांचा कार्यक्रम पुणे विद्यापीठात घेतला होता. आमच्या इथे लॉ चे डिपार्टमेंट आहे. एल एल एम चा अभ्यासक्रम चालतो. कधीतरी तिथेही आपण जरूर यावे. आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.

पुन्हा एकदा मी संयोजकांचे आभार मानतो, आपण  मला इथे बोलवलेत आणि संधी दिलीत चांगल्या लोकांबरोबर बसायला. शेवटी आपण ज्याला म्हणतोना सत्संग म्हणजे काय ? चांगल्या लोकांबरोबर बसणे. चांगल्या लोकांबरोबर उठणे. आणि त्याच्यातुनच दिवसभराची आपली दिनचर्या अशी असली पाहिजे की सुरुवातीची, सकाळचा थोडासा व्यायाम, दिवसभराचे काम आणि काम करत असताना कोठे तरी समाजामध्ये काहीतरी चांगले होते आहे, समाजासाठी चांगले करण्याची संधी मिळते आहे. ती संधी, तिचा लाभ घेणे आणि समाजासाठी काही करण्याचा प्रयत्न करणे. आणि सर त्याच्यामुळे मगाशी म्हणाले की संध्यकाळी छान झोप लागते. जे लोकं इथून चांगली असतात, इथून चांगले काम करत असतात, त्यांना चांगली झोप लागते रात्रीची. आणि मग आपल्याला पंच्याहत्तरी-ऐंशी नाही, शंभर वर्ष लाभोत. आणि आपल्या कडे आणखी समाजाचे चांगले काम आपल्या हातून होवो अशी स्वामीसमर्थांकडे सदिच्छा प्रदर्शित करतो, पुन्हा एकदा संयोजकांचे आभार मानतो

धान्यवाद

(दिनांक ५ मे २०१८ रोजी "श्री स्वामी समर्थ- औंध" पुरस्कार २०१८ सोहळ्यातील भाषणावरून संपादित)