मुख्य पृष्ठ

मानव धर्माचे अधिष्ठान परमार्थ व अध्यात्म आहे. एकविसाव्या शतकात अध्यात्माचा नवीन अर्थ शोधून मानव मानवतेकडे कसे उन्नत होईल हा दृष्टीकोन ठेऊन श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान कार्य करीत आहे. विज्ञान, धर्म, कर्मकांड, अध्यात्म आणि मानवतेचा विकास ह्या सर्वांचा एकविसाव्या शतकात कसा समतोल राखता येईल; मानवतेची पातळी वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरांवर कशी वाढवता येईल त्या साठिचा हा खारीचा वाटा आहे.

ऍडव्होकेट भास्करराव आव्हाड

तुम्हाला पहिला चॉईस हा करावा लागतो की आपल्याला मूल्याधिष्टित जीवन जगायचे आहे की मोलधिष्टीत जीवन जगायचे आहे. मग, मूल्याधिष्ठित जीवन जर असेल तर ते आतून जगलेले असते. मोलधिष्टीत बाहेरून जगलेले असते.

मनोगत

विद्यापीठाचे कार्य आहे समाज प्रबोधन. चांगले विद्यार्थी घडवणे आणि त्यातून समाज घडवणे. अशा समाजातल्या एका चांगल्या माणसाच्या जेव्हा कार्याचा कुठेतरी गौरव होत असतो तेव्हा विद्यपीठाचा सहभाग हा अपेक्षित आहे. मी इथे विद्यपीठाचा कुलगुरु नाही तर एक विद्यापीठाचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इथे उपस्थित आहे.

मा. श्री शिवाजीराव कचरे, (धर्मदाय सहआयुक्त, पुणे विभाग, पुणे)

स्वामी समर्थ प्रतिष्ठान जे आहे, या माध्यमातून तुम्ही जे समाज कार्य आणि समाजातल्या चांगल्या लोकांचे कौतुक करता, पुरस्कार देऊन, ते खरंच कौतुकास्पद आहे. मी तुमच्या परिवाराचाच एक भाग आहे. परंतु एक चॅरिटी कमिशनर म्हणून ज्यावेळेस मी अशा संस्थांकडे बघतो त्या वेळेस खरंच असे वाटते की अशा संस्था जास्तिजास्त निर्माण झाल्या पाहिजेत.

ऍडव्होकेट श्री श्रीकांत पाटील यांचे "श्री स्वामी समर्थ- औंध" पुरस्कार २०१८ सोहळ्यातील मनोगत

स्वामीसमर्थ प्रतिष्ठानचे हे सतरावे वर्ष आहे. मलाही सांगायला आनंद वाटेल की प्रतिष्ठान स्थापन करताना आम्ही सगळ्यांनी एक संकल्प सोडला होता. आणि तो संकल्प या पद्धतीचा होता, जर काम करायचे आहे तर ते चांगले आणि उत्तमच काम करायचे.

Shalaja Damale Bhan Program

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानतर्फे २०१८ च्या पालखी सोहळ्यात दिनांक १ मार्च २०१८ रोजी शैलजा दामले, स्वरगंधा यांनी अकरा बहारदार भजने सादर केली. सर्व भाविकांना ब्रह्मानंदीच्या भावात भुलवून टाकणारा, हरी भजनाचे सुख लुटण्याचा आनंद देणारा हा अनुभव होता.

Shri Swami Samarth Pratishthan, Aundh, Pune is a registered Trust established in 2000 by a group of devotees with a common interest of overall development of the society by conducting various charitable work like competitive exams for school children, conducting various spiritual development activities, educational activities, helping old and needy section of the society etc. What started out small has now developed into a well rounded and well managed programs with the help of highly dedicated devotees of the trust and the people around. 

आवाहन श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध चे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्य संपूर्णपणे समाजाभिमुख आहे. मुख्यत्वेकरून भक्तांचा उस्फूर्तपणे मिळालेला प्रतिसाद, श्री स्वामींची पालखी, अनेक स्पर्धांचे आयोजन, वार्षिक स्मरणिका यांवर हे कार्य आधारित आहे. या कार्याचा लाभ अधिकाधिक लोकांना व्ह्यावा यासाठी या ईश्वरी कार्यात तन-मन-धनाने जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे नम्र आवाहन आहे.

स्वामींची पालखी सालाबाद प्रमाणे यावर्षीही अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन सोमवार दिनांक २५ फेब्रुवारी २०१९ या दिवशी सायंकाळी होत आहे. या निमिताने सात दिवस सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ दिंडीने मंगळवार दिनांक १९.२.२०१९ रोजी दुपारी ४ वाजता उमाशंकर सोसायटी औंध पुणे येथून होणार आहे.