अग्निहोत्राची थोडक्यात ओळख 

अग्निहोत्र विधीसाठी केवळ ३ मिनिटे वेळ पुरतो आणि संपूर्ण घराला त्याचा लाभ होते.
अग्निहोत्र विधीसाठी केवळ ३ मिनिटे वेळ पुरतो आणि संपूर्ण घराला त्याचा लाभ होतो.  

अग्निहोत्र हा कुटुंबासाठी अत्यावश्यक असा स्वामी आदेश आहे. आजकाल सगळीकडे असलेल्या भयावह प्रदूषित स्थितीमुळे उत्पन्न होणाऱ्या समस्यांचे निराकरण करून त्यातून समाजाला यशस्वीपणे नवीन दिशा दाखवून धीर देण्याचे, मनःशांतीकडे नेण्याचे सामर्थ्य या अग्निहोत्रात आहे.

अग्निहोत्रामुळे आपण राहातो त्या घराच्या वातावरणात शुद्धिकारक (purifying) व पुष्टीकारक (nutritive) तत्वे प्रसारित केली जातात. अग्निहोत्र प्रक्रियेत निर्माण होणारी सूक्ष्मतम सूक्ष्म ऊर्जा (subtle energy) आणि उत्पन्न होणाऱ्या औषधी वायूमुळे संपूर्ण घराची शुद्धी होऊन त्यास आरोग्य प्राप्त होते. मानवी शरीर, मन, प्राणी, वनस्पती या सह संपूर्ण पर्यावरणाला स्वास्थ्य प्रदान करणारी ही प्रक्रिया आहे. ही वेदांनी सांगितलेली आहे. अशा प्रकारे सर्वाना लाभदायी ठरणारे अग्निहोत्र वैज्ञानिक नियमांवर आधारित आहे. 

प्रत्येक व्यक्ती ज्या वातावरणात वावरते त्याचा ती एक अविभाज्य घटक असते. आपल्या सभोवतालचे वातावरण प्राण व मन एकमेकांशी निगडित असतात. अग्निहोत्रामुळे वातावरण शुद्ध व आरोग्यदायी झाल्यामुळे तेथे हजर असणाऱ्या सर्वांच्या प्राण शक्तिवर व मनावर सकारात्मक परिणाम (positive effect) होतो. मनावरील तणाव भीती याचा प्रभाव नाहीसा होतो. या पासून मन मुक्त झाल्याने ते मनःशांती, प्रसन्नता व समाधान याचा अनुभव घेऊ लागते. त्या घरात उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना याचा अनुभव येऊ लागतो.

अग्निहोत्रामुळे संपूर्ण कुटुंबाला होणारे फायदे  

  • नित्य अग्निहोत्रामुळे घरातील वातावरण निर्जंतुक होते, शुद्धता येऊन घरातली पवित्रता वाढते.   
  • त्यायोगे प्राणशुद्धी व मन:शुद्धी लाभते. मनावरील ताण तात्काळ दूर होऊन प्रसन्नता लाभते. 
  • घराला अहोरात्र स्वास्थ्य लाभून घरातील ऊर्जाशक्ती कल्याणकारी प्रेरणा देऊ लागते. 

 

ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील
संस्थापक अध्यक्ष

>>  ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील यांचे स्वामी आराधनेवरचे बहुमोल मार्गदर्शन वाचण्यासाठी क्लिक करा.