श्री स्वामींची पालखी

पुण्यातील औंध-बाणेर परिसरात दर वर्षी श्री स्वामींच्या पालखीचे आगमन होते. या पालखी सोहळ्याचे "श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध" संस्थेतर्फे २००१ साला पासून आयोजन केले जाते. या आनंद सोहळ्यात परिसरातील भक्तजन मोठ्या संख्येने सहभागी होतात. सकाळी मंगल वाद्याच्या गजरात, मंगलमय वातावरणात पालखीचे आगमन होते. अत्यंत भावपूर्ण अवस्थेत स्वामीनामाच्या गजरात, उत्साहाने आणि भव्य मिरवणुकीने श्रींची पालखी विश्रांती स्थाना कडे जाते. वाटेत ठिकठिकाणी स्वागत कमानी उभ्या केलेल्या असतात. भक्त रांगोळ्या काढतात, फुलांची उधळण करतात, श्री चरणांचे दर्शन घेऊन तृप्त होतात. विश्रांती स्थानावर श्रींची पूजा अर्चा, मंत्र पठण, आरती, महाप्रसाद होतो. परिसरातील सर्व भाविक स्वामी भावात डुंबून प्रवचन, कीर्तन, संगीत सोहळा, नामस्मरण सप्ताह अशा विविध आध्यत्मिक कार्यक्रमात रममाण होतात. पालखीच्या दिवशी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

असा हा विविध कार्यक्रमाची रेलचेल असलेला भव्य सोहळा सात दिवसांचा असतो. या काळात संपूर्ण औंध-बाणेर परिसराला तीर्थक्षेत्राचे स्वरूप येते. दर वर्षी येणारी "श्री स्वामींची पालखी" परिसरातील भाविकांच्या जीवनामध्ये आत्मानंदाचा प्रसाद देणारी, स्वामीकृपेची अध्यात्मिक शिदोरी आहे.

यावर्षी पालखीचे सोहळ्याचे स्थान- मंगेश सोसायटी, पटांगण, औंध, पुणे. (भलेचौक ते औंधगाव रस्ता)

श्री स्वामींचा पालखी सोहळा २०१९

सालाबाद प्रमाणे यावर्षीही अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२० या दिवशी होत आहे. या कालावधीत सात दिवस सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ दिंडीने मंगळवार दिनांक ११.२.२०२० रोजी दुपारी ४ वाजता उमाशंकर सोसायटी औंध पुणे येथून होणार आहे.

मंगळवार ११ ते सोमवार १७ फेब्रुवारी २०२० या काळात सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, सर्व स्वामी भक्तांनी मंगेश को-ऑप. सोसायटी येथे उपस्थित राहून या आनंद सोहळ्याचा लाभ सोहळ्यात सहभागी व्हावे ही नम्र विनंती.

 सोहळ्यातील कार्यक्रम - २०२०