स्वामी आराधना कार्यक्रम- ३० जून २०२३

दिनांक: ३० जून २०२३,
वार: गुरुवार,
कार्यक्रम स्थळ: उमाशंकर सोसायटी औंध, पुणे.  

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध तर्फे स्वामी आराधना कार्यक्रम वृत्तांत  

श्री श्रीकांत पाटील, उमाशंकर सोसायटी औंध, यांचे कडे स्वामी आराधनेचा कार्यक्रम गुरुवारी संध्याकाली ७ ते ८ या काळात अत्यंत प्रसन्न व उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला. सगळ्या विश्वाला आपल्या अमृत धारांनी तृप्त करणाऱ्या, भगवंतांच्या लाडक्या पर्जन्य देवतेने स्वामी आराधने काळात आनंदाची वृष्टी केली. श्री विठ्ठल भक्तांच्या भक्ती भावात जिथे भगवंत पण रंगून जातात अशा आषाढी एकादशीचा हा मंगल दिवस होता. स्वामी आराधनेच्या स्थानी जसे स्वामींचे अस्तित्व जाणवत होते तसेच श्री कृष्णाच्या परम भक्त श्री राधाजी यांचे वावरणे पण जाणवले. स्वामींच्या पूजा मांडणीतील साधेपणा, नेटकेपणा, भक्तीभाव यातून ते दिसले. राधाकृष्ण भक्ती लिलांमध्ये दूध, लोणी याला विशेष महत्व आहे. आज स्वामींना प्रसादही दुधाचा झाला. आजच्या आराधनेमध्ये स्वामी शक्तीच्या प्रसन्नतेची विशेष अनुभूती आली. जवळ उभी स्वामी शक्ती कळूदे! या महावाक्याचा बोध आजच्या आराधनेत आला

कार्यक्रमाची सुरुवात अग्निहोत्राने झाली. पुढे क्रमाने स्वामी पूजा, कालभैरव अष्टक, स्वामींची आरती, कापूर आरती, मंत्र पुष्पांजली हे पूजा विधी झाले. या नंतर स्वामी नामस्मरण, स्वामींचे ध्यान आणि गजर होऊन मुख्य कार्यक्रम संपन्न झाला.

श्री पाटील काकांनी विचार चिंतन मध्ये अध्यात्मातील भक्त अभक्त लक्षणें, शुद्ध-असुद्ध विचारधारा, लक्ष्मी अलक्ष्मी यांचे समाजिक प्रवाह, आणि समाजिक कार्यावर पडणारे प्रभाव यावर  व्यवहारातले अनुभव सांगून बोधपूर्ण मार्गदर्शन केले. प्रसाद वाटप होऊन स्वामीशक्तीची जाणीव देणारा आराधनेचा कार्यक्रम पूर्ण झाला.