'।।राजाधिराज।। श्री स्वामी समर्थ' या स्मरणिकेतील विचारांचे सामर्थ्य

मनुष्य योनी व मनुष्य देह यांचे श्री ज्ञानेश्वर व साईनाथ यांनी केलेले वर्णन

देह तो आहे उसनवारी । पंचभूतांची सावकारी ।।
निःस्वार्थ साधले यावरी । परतणे माघारी ज्याचा त्या ।।
(श्री साई सच्चरित - ओवी ८१ अध्याय ४२)

लेखक: प्रा. डॉ माधवराव दीक्षित , स्मरणिका वर्ष: 2014

योग सर्वांसाठी

शरीराचे व्यवस्थापन व स्वताच्या मनाचा मोकळेपणा ही काय चीज आहे, हे योग्य या विषयाकडे वाळल्याशिवाय कळणारच नाही.

लेखक: डॉ. नितीन उनकुले , स्मरणिका वर्ष: 2014

देह देवाचे मंदिर

संपूर्ण श्वासाला जे निरोगी घर देते, त्याला शरीर म्हणतात. शरीराला दुसरा शब्द आहे देह.

लेखक: डॉ. यशवंत पाठक , स्मरणिका वर्ष: 2014

शरीर एक साधन

माणूस हा असा एकच प्राणी आहे की त्याला देवाने भरपूर बुद्धि दिलेली आहे. त्या बुद्धीच्या जोरावर त्याने अनेक चांगल्या गोष्टी निर्माण केल्या आहेत. 

लेखक: सौ जया अभय जोशी , स्मरणिका वर्ष: 2014

शारिरीक स्वास्थ्य आणि संगीत

संगीत हे सर्वव्यापी आहे. संगीत हे सर्वस्पर्शी आहे. संगीताला जातपात समजत नाही. प्रत्येक माणसाच्यामध्ये कुठल्यातरी स्वरूपात संगीताचे वास्तव्य असते.

लेखक: माधव जोशी , स्मरणिका वर्ष: 2014

शरीर

असे म्हणतात की शरीरात पित्त, संसारात वित्त, परमार्थात चित्त असावे. त्यातच  अनमोल मिळालेल्या देहाचे, शरीराचे सार्थक आहे. 

लेखक: श्रीमती विमल पाटील , स्मरणिका वर्ष: 2012

शरीर चांगले राहण्यासाठी

शरीरातील सर्व अवयवांचा एकमेकांशी मेल असणे हे सुखी व दीर्घ आयुष्याची शरीर लक्षणे आहेत.

लेखक: प्रा. डॉ. सौ. शुभदा बोथरे , स्मरणिका वर्ष: 2014

शरीर घरटे अचुक जपावे

हे शरीर आपणाला शंभर वर्षाच्या भाडेपट्ट्याने मिळालेले आहे ते व्यवस्थित वापरावे, डागडुजी करावी, मस्ती करू नये, सर्व काही ठीक होते.

लेखक: प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी , स्मरणिका वर्ष: 2014

श्री स्वामी समर्थांचे स्वरूप

श्री स्वामी समर्थांची सिध्दयोगींमध्ये सर्वश्रेष्ठ म्हणून गणना केली जाते. परमेश्वर प्राप्तीचे ज्ञानयोग, भक्तियोग, हटयोग आणि राजयोग हे चार मार्ग असले तरी स्वामींनी आपल्या तपश्चर्येच्या बळावर हटयोग साध्य केला होता.

लेखक: पंडित कृष्णकांत नाईक , स्मरणिका वर्ष: 2014

चुकतो तो माणूस ?

चुकतो तो माणूस असं म्हटले जाते म्हणजे त्याचे चुकणे हे गृहीत धरूनच हे विधान के ले गेलेले आहे असे दिसून येते. 

लेखक: दीपक चैतन्य , स्मरणिका वर्ष: 2014

निसर्ग व शरीर (डोळस विज्ञान)

या विश्वातील आपलं मानवी अस्तित्व म्हणजे आपलं शरीर होय !

लेखक: श्यामसुंदर जोशी , स्मरणिका वर्ष: 2014

सन्मान माझ्या मातृभाषेचा

जागतिकीकरणाच्या आजच्या युगात मातृभाषेचा दुराग्रह जरी वेडेपणाचा असला तरी आग्रही असणे गैर नाही हे ही लक्षात भेणे गरजेचे आहे.

लेखक: डॉ धुंडिराज वासुदेवराव कुर्डुकर, स्मरणिका वर्ष: 2011

भारतीय अभिजात संगीताचे आध्यात्मिक महत्व

संगीतातील नादाचे सर्व प्रथम स्वरूप आहे ॐ. आपल्या तत्वज्ञानानुसार ॐ हा सृष्टीचा आदिकंद आणि अव्यक्त परब्रह्माचे व्यक्त रूप आहे.  सूर हे निराकार आहेत. अमूर्त आहेत. संगीताची साधना करीत असताना किंवा गायन करीत असताना या निराकार स्वाराचीच उपासना कलाकार करीत असतो. 

लेखक: डॉ सौ सुहासिनी कोरटकर, स्मरणिका वर्ष: 2011

शिक्षण

भारतभूमी हि संतांची, ऋषिमुनिंची भूमी आहे. भारत या नावातच फार उदात्त, विलक्षण विचार, भावना दडलेली आहे. 'भा' म्हणजे ज्ञान किंवा भक्ती, 'रत' म्हणजे रममाण. सतत ज्ञान भक्तीमध्ये रममाण असणाऱ्या लोकांचा देश भारत देश. 

लेखक: संजय गोडबोले गुरुजी, स्मरणिका वर्ष: 2011

कृपासिंधू (श्री स्वामी समर्थ)

'अरे, तू माझ्यावर श्रद्धा ठेवून मला शरण ये. अकर्म करू नकोस. सत्याने वाग, परोपकारी वृत्ती धारण कर. सर्वांशी प्रेमभाव ठेव. असे आचरण केलेस तरच मी म्हणेन भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि नाही केलेस तर तुझे नशीब तुझ्यापाशी. 

लेखक: मोहन श्रीनिवास विळजीकर, स्मरणिका वर्ष: 2011

स्वामी कार्याचा विश्वविस्तार

'स्वामी समर्थ', हे दोन शब्द कानी पडलेकी, गुजरातपासून कर्नाटक ते आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीपर्यंतच्या भाविकांत चैतन्याच्या उर्मी निर्माण होतात.  

लेखक: एस. के. कुलकर्णी , स्मरणिका वर्ष: 2011

आत्मगौरवाचा सन्मान

स्वामी नेहेमी वटवृक्षाखाली बसायचे. वाट म्हणजे पूर्ण ज्ञान. देवांनाही श्रेष्ठ ज्ञान देणारा वटवृक्ष हा पर्यावरणाचा पितामह आहे. म्हणून वाडाला सांभाळणे म्हणजे स्वामींना सांभाळण्यासारखे आहे.

लेखक: डॉ. यशवंत पाठक, स्मरणिका वर्ष: 2011

अध्यात्म आणि विज्ञान

भारतातील प्राचीन मंदिरे, मठ, मठाधिपती ही प्राचीन उर्जाकेंद्रे आहेत. आधुनिक चैतन्य मापका वरून, फक्त हात एका साध्या संगणक यंत्रावर ठेवून, मानवी चैतन्य ज्ञान, रोग अभ्यासही सहज शक्य झाला आहे.

लेखक: प्रा. शुक्ल र. ना., स्मरणिका वर्ष: 2011

स्वतःला ओळखणं म्हणजेच आत्मगौरव

भक्ती कशी असावी, तर प्रमाणे केलेली, श्रद्धेने केलेली असावी. भीतीपोटी भक्ती उपयोगाची नसते. ही भक्तीच स्वतःलाच काय, पण समाजजीवनाला बल देते. शेवटी एकेक माणूस सुखी झाला तर समाज सुखी होतो.

लेखक: दिलीप फलटणकर, स्मरणिका वर्ष: 2011

महाराज प्रासादिक स्वरूपात प्रगटले

मी तुझया पाठीशी उभा आहे या ब्रीद वाक्याचे सर्वाना अनुभव येतातच, शिवाय महाराज एखाद्या भक्तांकडून चागले कार्य व सेवा ही करून घेतात. 

लेखक: विजयकुमार रघुनाथ महामुनी, स्मरणिका वर्ष: 2011

आम्ही भाग्यवान आहोत

सद्वर्तन करण्याची बुद्धी होणे, हीच ऐश्वर्यसंपन्नता आहे. अयोग्य आचार करून प्राप्त केलेल्या संपत्तीचा आनंद कोणीच घेऊ शकत नाही.

लेखक: श्यामसुंदर प्रल्हाद जोशी, स्मरणिका वर्ष: 2011

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे

हे उदगार आज माझ्या आयुष्यात मला बरेच काही देऊन गेले आहेत. खरे म्हणाल तर ह्या वाक्यांनीच मला जो दिलासा दिला आहे त्यामुळे मी अजूनही ह्या सो कॉल्ड मॉडर्न युगात तग धरून आहे.

लेखक: आरती जोशी, स्मरणिका वर्ष: 2011

सिद्धयोगी श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थांची सिद्ध योग्यांमध्ये सर्वश्रेष्ठ योगी म्हणून गणना केली जाते. स्वामींनी आपल्या तपश्चर्येच्या बळावर हटयोग साध्य केला होता. बालोन्मत्त पिशाश्चवृत्ती, निस्पृहता, वैराग्य, ज्ञानात्मक दिव्य सामर्थ्य,  शीघ्र कृपा आणि अंतर्ज्ञान हे स्वामींच्या ठायी प्रभावी गुण होते.

लेखक: पंडित कृष्णकांत नाईक, स्मरणिका वर्ष: 2011

'अभय': सद्गुणांचा सेनापति

आपण जी साधना करतो त्यातून आपल्या अनुभवास काय आले, किती सद्वृत्ती खोल रुजल्या, किती सद्गुण अंगी बाणले, जीवन किती सेवामय झाले, जीवनाची कला किती चढली हे तपासणे यालाच जीवनाची परीक्षा म्हणतात.

लेखक: डॉ. रामचंद्र देखणे, स्मरणिका वर्ष: 2012

निर्भयता हाच स्त्रीधर्म

प्रवाहा विरुद्ध जाऊन आपले सामर्थ्य जाणून समाजापुढे आपले कर्तृत्व आत्मविश्वासाने सादर करणे म्हणजे निर्भयता. आपल्या देशाच्या मातीने अनेक निर्भय स्त्रियांचे चरित्र घडवले आहे.

लेखक: ऍड. गंधाली भिडे, स्मरणिका वर्ष: 2012

अभय

सर्व काळात, सर्व परिस्थितीत, सर्व ठिकाणी, अनुकूल अथवा प्रतिकूल वातावरणात सदा संतुष्ट आणि त्यामुळे निर्भय राहणे हे केवळ विवेक वैराग्याने मिळणाऱ्या आत्मज्ञानानेच शक्य आहे. 

लेखक: अरविंददास, स्मरणिका वर्ष: 2012

सत्संग

भक्ती आणि ज्ञान या दोन धरणाची ज्या संगामध्ये वर्षावता आहे, नाम आणि आकाराची मर्यादा तेथे बंधनकारणता असू शकत नाही, अशा सत्संगात अनंत गणित व्यर्थ गेलेल्या श्वासाचा ताळेबंद मोजमापात येऊ शकतो.

लेखक: माँ धर्मदीक्षा, स्मरणिका वर्ष: 2012

अगा अभय येणे नावे...

अभय हा सर्व ज्ञानांचा अभिप्राय किंवा निष्कर्ष आहे. अगा अभय येणे नांवे । बोलिजे ते हे जाणावे । सम्यक् ज्ञानाचे आघवे । धावणे हे ।। १६।७३ ज्ञा ।। याचाच अर्थ असा की, जो अद्वैतस्वरुप झाला आहे त्याला भीतीच उरत नाही. कारण भिणार कोणास ?

लेखक: बाळकृष्ण महाराज जाधव, स्मरणिका वर्ष: 2012

श्री स्वामी समर्थ अभय वाचन

निर्भय मानाचं संकटास निःशंकपणे सामोरे जाते व विवेक जागृत असला की त्यावर मात करण्याचे मार्ग शोधू लागते. ज्याचा कोणी पाठीराखा नसतो त्याला पाठीराखा भगवंत असतो. जागी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. पण तो सत्याचा प्रतिपालक आहे एव्हढे लक्षात ठेवावे.

लेखक: वसंत काशिनाथ गोडबोले, स्मरणिका वर्ष: 2012

निर्भयता

भगवद गीतेच्या सोळाव्या अध्यायात दैवी संपत्तीचे विवेचन करताना भगवंतांनी पहिलाच जो गुण सांगितला आहे, तो आहे अभयम. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात "आता तयांचि दैवगुणा । माजी धुरेचा बैसणा । बैसे तया आकर्णा । अभय ऐसे ।१६।१८।।". अभय म्हणजे निर्भयता, भीती न वाटणे. खरोखरच या स्थितीची कल्पना किती आनंददायक आहे?  

लेखक: डॉ. सौ. मृणालिनी कुलकर्णी , स्मरणिका वर्ष: 2012

नामस्मरण - जीवन तारक साधन

आपले जीवन आनंदाने भरून जाण्यासाठी समाधानाने भरून राहण्यासाठी देवाबद्दल एका अकृत्रिम प्रेमभावनेची आवश्यकता आहे. देवाबद्दल नितांत श्रद्धा, प्रेम असणे हा आपल्या स्वभावाचा स्थायी भाव असला पाहिजे.

लेखक: अलका जोशी, स्मरणिका वर्ष: 2012

तीर्थक्षेत्र अक्कलकोट- दर्शन यात्रा

अक्कलकोटी वटवृक्षाच्या छायेखाली स्वामी समर्थांचे एकवीस वर्षे वास्तव्य होते. याच वटवृक्षाच्या मागे ज्योतिबा पांडे नावाच्या स्वामीभक्ताने स्वामींच्या पादुका ठेवून छोटेशे मंदिर उभारले. त्यानंतर अक्कलकोटच्या तत्कालीन संस्थानिकांनी सभामंडपाचे काम पूर्ण केले.

लेखक: पंडित कृष्णकांत नाईक , स्मरणिका वर्ष: 2012

स्वामी कार्याचा विश्वविस्तार

स्वामींची कीर्ती देशभर पसरली होती आणि त्यांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना ब्रिटिशांनी सोलापूरच्या आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या, याचा काही ठिकाणी उल्लेख आढळतो. स्वामींच्या पीठावरील अवतारी महात्मा परमसद्गुरु श्री गजानन महाराज (१९१८-१९८७) म्हणाले, "स्वामी अक्कलकोटला आले ते धर्म सिंहासन स्थापण्यासाठी" 

लेखक: एस. के. कुलकर्णी , स्मरणिका वर्ष: 2011

श्री स्वामींचे अभयदान

सद्भक्तांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी नित्य सद्गुरूंचा वास असतो, म्हणजे स्वामी अंतरंगात वास करतात. त्यामुळे स्वामींचे हे आस्वासन बाहेरून येत नाही. तर अंतरंगातून हा दिव्या आवाज भक्तांच्या कानी पडतो. तोच नाद कानामनात घुमू लागतो आणि त्याच्या सोबतीला "भीत नाही मी कुणा", याची प्रचिती येते. भीती संपली कि  निर्भयपणे जीवन जगताना, जीवन सत्कारणी लागते.

लेखक: डॉ. आरती दातार, स्मरणिका वर्ष: 2012

सामर्थ्य आहे विचारांचे

आपले विचार सामर्थ्यवान होण्यासाठी सतत चांगल्या साहित्याचे वाचन होणे गरजेचे आहे. दिसामाजी काहीतरी ते लिहावे । प्रसंगी अखंडीत वाचीत जावे. सतत सत्संग हवा. संताच्या वाग्मयाच्या अनुसंधानात असावे. आपली कर्म-कर्तव्ये सांभाळून भगवंतांच्या नामाचे अनुसंधान हवे.

लेखक: डॉ.सौ. मृणालिनी कुलकर्णी, स्मरणिका वर्ष: 2016

सामर्थ्य विचारांचे

मन हा शरीरातील अव्यक्त अवयव खरा, पण अवघ्या देहावर त्याचीच सत्ता चालते. म्हणूनच रामदास स्वामींनी मनाला विचारी मन म्हंटलय.मनाला उपदेश करताना ते म्हणतात, जागी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तूंचि शोधूनि पाहे. 

लेखक: आशा कुलकर्णी , स्मरणिका वर्ष: 2016

सद्विचाराची दिवाळी

परमार्थ मार्गामध्ये विचारांचे महत्व अनन्यसाधारण असते. ज्याला आत्मसाक्षात्कार  करून घ्यायचा आहे त्याच्या साठी विचार हे कर्तव्यच आहे, असे भगवान श्रीमद शंकराचार्य स्वामी महाराज सांगतात.

लेखक: रोहन विजय उपळेकर, स्मरणिका वर्ष: 2016

विचारांचे सामर्थ्य

माणसालाच फक्त विशेष बुद्धी आहे. तो केवळ शरीर नाही. तो केवळ मन ही नाही. त्याच्या जवळ या दोन्हींना जोडणारी आणि भिन्न करणारी एक शक्ती आहे म्हणूनच विचारांचा विचार करणे शक्य आहे.

लेखक: सुधाकर द. जोशी , स्मरणिका वर्ष: 2016