रक्षाबंधन एक सामाजिक भान

महोदय, 

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध गेली २३ वर्षे विविध कार्यक्रमातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहे. प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून शनिवार दिनांक २ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत बालगंधर्व नाट्यगृह मध्ये रक्षा बंधनाच्या निमित्ताने "रक्षाबंधन एक सामाजिक भान" या विषयातील दिग्गज अशा मान्यवरांना आमंत्रित केलेले आहे. त्यामध्ये निवृत्त  एअर चीफ मार्शल श्री भूषण गोखले, आणि चाणक्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व माजी सनदी अधिकारी श्री अविनाश धर्माधिकारी आणि लोकमतचे संपादक श्री संजय अवटे यांचा सहभाग आहे. श्री रितेश कुमारजी कमिशनर ऑफ पोलीस पुणे आणि श्री विक्रम कुमारजी आयुक्त पुणे महानगरपालिका यांचाही सहभाग यात आहे. 

समाजामध्ये आत्मविश्वास, आत्मश्रद्धा व विचारांच्या सकारात्मकतेने समाधान व यशस्वी जीवन जगण्यासाठी आणि कुटुंबामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग प्रतिष्ठान करीत आहे. उदाहरणार्थ आजची लहान मुले उद्याची उत्तम नागरिक बनण्या करिता लहान मुलांकडून पाठांतर स्पर्धा, निबंध स्पर्धा, स्तोत्र पाठांतर, करून घेण्यात येते. त्यामुळे मुलांचे ज्ञान वाढते. मुलांचे आत्मबळ वाढते आणि मुलांचा जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वृद्धिंगत होतो. व आपली पुढची पिढी शारीरिक व मानसिक रित्या सक्षम होण्या करिता प्रयत्न केले जातात. ज्या विषयाचे चिंतन आणि मनन केल्याने अनुकरण होऊ शकते असा विषय निवडून त्याच विषया वरती कीर्तन, परिसंवाद यांच्या मार्फत कुटुंबामध्ये सकारात्मक परिवर्तन घडू शकेल असा प्रयत्न श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान करत आहे. 

दरवर्षी निरामय आरोग्या साठी योग व प्राणायामाचे शिबीर प्रतिष्ठान तर्फे आयोजित केले जाते. व त्या माध्यमातून कुटुंबाचे, समाजाचे तसेच राष्ट्राचे शारीरिक व मानसिक आरोग्य जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. प्रतिष्ठान तर्फे दर गुरुवारी कुटुंब स्वास्थ्य करता आणि मानसिक स्थैर्य निर्माण होण्या करिता ७५४ कुटुंबात स्वामी आराधना कार्यक्रम करण्यात आला आणि करण्यात येत आहे. अशा अनेक कुटुंबांकडून आनंद आणि समाधान मिळाल्याचे अभिप्राय मिळाले आहेत. तसेच लोकांना आनंद देण्या करिता नृत्य, संगीत, वैद्यकीय तपासणी असे कार्यक्रम आयोजित केले जातात. समाजामध्ये विविध कार्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीस श्री स्वामी समर्थ औंध पुरस्काराने सन्मानित केले जाते.

या कार्यक्रमास आपण अगत्य पूर्वक उपस्थित राहून यज्ञीय अनुष्ठानात सहभागी व्हावे ही विनंती. आपले आर्थिक सहकार्य कार्यक्रमाच्या दृष्टीने मोलाचे आहे.  


आपला विश्वासू 

संस्थापक अध्यक्ष ऍड. श्रीकांत गोविंद पाटील, 
श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान

एक नम्र आवाहन

प्रतिष्ठानचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्य संपूर्णपणे समाजाभिमुख आहे. मात्र सध्या ते मुख्यत्वेकरून अनेक स्पर्धांचे आयोजन करुन त्यापासून मिळणाऱ्या वर्गण्या, वार्षिक स्मरणिकेतल्या जाहिराती आणि भक्तांनी उस्फूर्तपणे वाहिलेल्या भेटी यांवरच अवलंबून आहे. या कार्याचा लाभ अधिकाधिक लोकांना व्ह्यावा यासाठी या ईश्वरी कार्याला जास्तीत जास्त साह्य करावे असे आपण सर्वाना नम्र आवाहन आहे.

QR Code Shri Swamarth Prathisthan Aundh
जीपे, फोनपे, युपीआय पे ने देणगी देण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा. 

जीपे, फोनपे, युपीआय पे ने देणगी देण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा. 

डोनेशन साठी माहिती

बँकेचे नाव: सारस्वत को ऑप बँक, आय. टी. आय. रोड, औंध, पुणे.
अकाऊंटचे नाव: Shri Swami Samarth Pratisthan
सेविंग बँक अकाउंट नंबर: 083200100009540
IFSC Code: SRCB0000083

बँकेचे नाव: NKGSB को ऑप बँक लिमिटेड, औंध, पुणे.
अकाऊंटचे नाव: Shri Swami Samarth Pratisthan
सेविंग बँक अकाउंट नंबर: 567
IFSC Code: NKGS0000030

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध  

संस्थापक अध्यक्ष - ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील

नोंदणी क्रमांक: महाराष्ट्र/३५८/२००८/पुणे 

पत्ता: ३, उमाशंकर सोसायटी, चोंधे पार्क, परिहार चौक जवळ, औंध, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड ४११०६७.