दिनांक: १ जून २०२३,
वार: गुरुवार,
कार्यक्रम स्थळ: मान स्मृती सोसायटी औंध गावं पुणे.
श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध तर्फे स्वामी आराधना कार्यक्रम वृत्तांत
श्री कुणाल पिल्ले यांच्या कडे स्वामी आराधनेचा कार्यक्रम गुरुवारी संध्याकाली ७ ते ८ या काळात मोठ्या भावपूर्ण वातावरणात पार पडला. "जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय" याची अनुभूती या कार्यक्रमात आली. या काळात सोसाट्याचा वारा आणि पाऊस त्याच्या भयंकर शक्तिचे अस्तित्व संपूर्ण परिसरात दाखवत होता. गोंधळलेल्या आणि आचंबित मानसिकतेमध्ये बाहेरचे सगळे जग अडकले असताना स्वामी पूजनाच्या स्थानी मात्र याची जराही बाधा न्हवती. या शक्ती "वायू देवता" आणि "पर्जन्या देवाता" या आपल्या मूळ स्वरूपात स्वामीचरणी निवांत झाल्या होत्या. पूजेत त्यांची कसलीही बाधा न्हवती. हजर असणाऱ्या प्रत्येकाला अंतरंगातल्या प्रसन्नतेची आणि मांगल्याची अनुभूती आली.
कार्यक्रमाची सुरुवात अग्निहोत्राने झाली. या नंतर स्वामी आराधनेचा ऑडिओ नवीन पद्धतीने ब्लू टूथ या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वाजवला. त्याच्या लयीत रममाण होऊन सर्व उपस्थित स्वामी भक्तांनी स्वामी पूजा, कालभैरव अष्टक, स्वामींची आरती, कापूर आरती, मंत्र पुष्पांजली हे पूजा विधी केले. या नंतर स्वामी नामस्मरण, स्वामींचे ध्यान आणि गजर होऊन मुख्य कार्यक्रम संपन्न झाला.
श्री पाटील काकांनी विचार चिंतन मध्ये अग्निहोत्र महत्व, त्याची आजची गरज यावर महाभारतातील रसाळ कथा सांगून बोधपूर्ण मार्गदर्शन केले. प्रसाद वाटप होऊन स्वामी आराधनेचा कार्यक्रम पूर्ण झाला.
शरण आलेल्या भक्ताची सर्व प्रकारे काळजी घेऊन किती कृपाळूपणे स्वामी त्याची भक्ती स्वीकारतात असा बोध देणारा हा स्वामी आराधना कार्यक्रम होता.