प्रतिष्ठानचे कार्यक्रम

प्रतिष्ठानचे कार्यक्रम
ह. भ. प. सतिश महाराज काळजे पुणे, आपले बारदार कीर्तन करतांना, दिनांक २८ फेब्रुवारी २०१८    

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाज प्रबोधनासाठी विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

औंध गावाचा स्वामी समर्थ पालखी सोहळा व त्यानिमित आयोजित केलेले विविध कार्यक्रम प्रत्येक स्वामी भक्तांना मनःस्वास्थ देणारे आणि आनंददायी आहेत. ज्या प्रमाणे साधकाच्या जीवनामध्ये नाव विधा भक्तीचे महत्व मोलाचे आहे. त्यातली पहिली पायरी श्रवण भक्तीची आहे. आपण त्याचेच साधक आहोत. आणि त्याच साठी सात दिवसाच्या सोहळ्याचे आयोजन करतो. स्वामी भक्तांना उन्नत होण्यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन असते.

"जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्यांशी सांगावे" या संतांच्या वचनाप्रमाणे त्यात वेदपठण, दिंडी,  वारकरी कीर्तन, भजन, प्रवचन, नारदीय कीर्तन, कीर्तन जुगलबंदी, भक्ती संगीत, नृत्य, परिसंवाद, अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.  

प्रवचन परिसंवाद, कीर्तन, संगीत, नृत्य व पुरस्कार सोहळा २०१९- कार्यक्रम पत्रिका

Title कार्यक्रम आणि वक्ते
१९ फेब्रुवारी २०१९ मंगळवार कार्यक्रम सायंकाळी ४.०० ते ६.००

दिंडी- श्रीस्वामी भक्त परिवार, औंध  

१९ फेब्रुवारी २०१९ मंगळवार कार्यक्रम सायंकाळी ६.०० ते ७.००

वेदपठण- पौरोहित्य वर्ग, औंध

१९ फेब्रुवारी २०१९ मंगळवार कार्यक्रम सायंकाळी ७.०० ते ९.००

कीर्तन- ह. भ. प. भावार्थ रामचंद्र देखणे (युवा कीर्तनकार)

२० फेब्रुवारी २०१९ बुधवार कार्यक्रम पहाटे ५.३० ते ७.००

योग प्राणायाम शिबीर- श्री प्रितेश लाड राज्य. प्रभारी युवा भारत, पतंजली, पुणे.

२० फेब्रुवारी २०१९ बुधवार कार्यक्रम सायंकाळी ६.०० ते ७.००

भजन- सौ. माणिकताई दामले व सहकारी, औंध.

२० फेब्रुवारी २०१९ बुधवार कार्यक्रम सायंकाळी ७.०० ते ८.३०

संगीताचा कार्यक्रम- पंडीत शरद करमळकर आणि सहकारी, पुणे.

२१ फेब्रुवारी २०१९ गुरुवार कार्यक्रम पहाटे ५.३० ते ७.००

योग प्राणायाम शिबीर - श्री प्रितेश लाड राज्य. प्रभारी युवा भारत, पतंजली, पुणे 

२१ फेब्रुवारी २०१९ गुरुवार कार्यक्रम सायंकाळी ६.०० ते ७.००

स्वरमोहिनी तर्फे संगीत मैफल- सौ. मोहिनीताई सहस्रबुद्धे 

२१ फेब्रुवारी २०१९ गुरुवार कार्यक्रम संध्याकाळी ७.०० ते ८.३०

लठ्ठपणा कमी करणे (विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध)- प्रा. डॉ. जगन्नाथ दिक्षित (विभाग प्रमुख, डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी मेडिसीन, शासकीय महाविद्यालय, लातूर)

२२ फेब्रुवारी २०१९ शुक्रवार कार्यक्रम पहाटे ५.३० ते ७.००

योग प्राणायाम शिबीर- श्री प्रितेश लाड राज्य. प्रभारी युवा भारत, पतंजली, पुणे

२२ फेब्रुवारी २०१९ शुक्रवार कार्यक्रम सायंकाळी ६.०० ते ६.३०

स्तोत्र पाठांतर स्पर्धेचा बक्षीस समारंभ- सौ. राणी अमोल अडगुलवार, सहायक धर्मदाय आयुक्त, पुणे; जगप्रसिद्ध जादुगार श्री संजय रघुवीर, लीलावती जोगळेकर, श्री अविनाश फडके, सौ विना फडके (कलाकार आई रिटायर्ड होते) यांच्या हस्ते संपन्न होईल.

२२ फेब्रुवारी २०१९ शुक्रवार कार्यक्रम सायंकाळी ६.३० ते ७.३०

भजन- सौ. शुभदा जोशी आणि सहकारी, औंध. 

२२ फेब्रुवारी २०१९ शुक्रवार कार्यक्रम संध्याकाळी ७.३० .ते ८.३०

नृत्यसंध्या- सौ वेदांती भागवत आणि सहकारी, पुणे.

२३ फेब्रुवारी २०१९ शनिवार कार्यक्रम पहाटे ५.३० ते ७.००

योग प्राणायाम शिबीर- श्री प्रितेश लाड राज्य. प्रभारी युवा भारत, पतंजली, पुणे

२३ फेब्रुवारी २०१९ शनिवार कार्यक्रम सकाळी ९.०० ते १.००

मोफत वैद्यकीय तपासणी आणि मोतीबिंदु ऑपरेशन- (१) लायन्स क्लब पुणे, डॉ. प्रदीप दामले, नेत्ररोग तज्ञ, (२) एम्स हॉस्पिटल औंध, पुणे (नाव नोंदणी आवश्यक)

२३ फेब्रुवारी २०१९ शनिवार कार्यक्रम सायंकाळी ५.३० ते ६.३०

भजन- सौ उषाताई येवले आणि सहकारी औंध.

२३ फेब्रुवारी २०१९ शनिवार कार्यक्रम संध्याकाळी ६.३० ते ८.३०

परिसंवाद- श्री प्रमोद भाई शिंदे, मनशक्ती केंद्र लोणावळा, विषय- विचारांचे प्रदूषण; वैद्य अभय जमदग्नी, विषय- आयुर्वेद; डॉ अविनाश वाचासुंदर, विषय- आरोग्य. डॉ मधुकर कृष्णां देसले, विषय- योग विज्ञानातून आरोग्याकडे.

२४ फेब्रुवारी २०१९ रविवार कार्यक्रम पहाटे ५.३० ते ७.००

योग प्राणायाम शिबीर- श्री प्रितेश लाड राज्य. प्रभारी युवा भारत, पतंजली, पुणे

२४ फेब्रुवारी २०१९ रविवार कार्यक्रम सायंकाळी ५.०० ते ६.००

भजन- सौ. अपर्णा राहुरीकर, औंध. 

२४ फेब्रुवारी २०१९ रविवार कार्यक्रम सायंकाळी ६.०० ते ७.००

अग्निहोत्र होम- श्रीक्षेत्र शिवपुरी अक्कलकोट तर्फे आयोजित 

२४ फेब्रुवारी २०१९ रविवार कार्यक्रम सायंकाळी ७.०० ते ८.००

नृत्यसंध्या- भरतनाट्यम अमृता जमदग्नी, सौ सायली कुलकर्णी, सौ पल्लवी वझे, पुणे.

२४ फेब्रुवारी २०१९ रविवार कार्यक्रम संध्याकाळी ८.०० ते ९.००

श्री स्वामी समर्थ औंध पुरस्कार सोहळा- 

श्री स्वामी समर्थ औंध पुरस्कार युवा उद्योजक मा. श्री. हणमंतराव गायकवाड (संस्थापक अध्यक्ष भारत विकास ग्रुप);
हस्ते-पदमविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, शास्त्रज्ञ. प्रमुख उपस्थिती अविनाश धर्माधिकारी आय. ए. एस. (चाणक्य मंडळ, पुणे)

२५ फेब्रुवारी २०१९ सोमवार कार्यक्रम संध्याकाळी ६.०० ते ७.००

श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे विठ्ठल मंदिराजवळ आगमन व मिरवणुक

मिरवणूक मार्ग- विठ्ठल मंदिर - भैरवनाथ मंदिर - शिवाजी पुतळा - मंगेश सोसायटी.

२५ फेब्रुवारी २०१९ सोमवार कार्यक्रम संध्याकाळी ७.०० ते ७.३०

आरती व प्रसाद वाटप 

२५ फेब्रुवारी २०१९ सोमवार कार्यक्रम संध्याकाळी ७.०० ते ९.००

भक्तिरंग- श्री संतोष देशमुख, औंध पुणे (कै. सुहासीनीताई कोरटकर यांचे शिष्य)

उत्सावातील विविध कार्यक्रमाचे फोटो